Dhananjay Munde
महाराष्ट्र

ब्रेकिंग : धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्या आरोपांवर दिलं स्पष्टीकरण

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर त्यावर आता मुंडे यांनी स्पष्टीकरण दिल आहे. ‘आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध श्रीमती करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. याबाबत मी खुलासा करू इच्छितो की, श्रीमती करुणा शर्मा यांच्या बाबतीत मी यापूर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असुन, त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमुद केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून मा. उच्च न्यायालयाने मा. मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश मा. श्रीमती ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे. सदर मेडिएशन च्या दोन बैठक झालेल्या असुन दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशन मध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्दे चर्चेत आणि निर्णयार्थ आहेत’.

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, दुसऱ्या पत्नीने गंभीर आरोप लावत केली तक्रार

मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारं असल्याचं म्हणत, ‘मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसुन निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतु दिसुन येतो. कृपया सदर बाब ही न्यायप्रविष्ठ असुन न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे’, ही बाब त्यांनी मांडली.

ह्या प्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतुने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही हा मुद्दा अधोरेखित करत वस्तुस्थिती आणि न्यायालयीन प्रकरण, एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाब लक्षात घेऊन सामाजिक जीवनातील व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी विनंती मुंडे यांनी केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत