Dhananjay Munde's troubles escalated, his second wife complained of serious allegations
महाराष्ट्र मुंबई

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, दुसऱ्या पत्नीने गंभीर आरोप लावत केली तक्रार

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने त्यांच्या विरोधात मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यामुळे मुंडे यांच्यापुढे पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात गेल्या तीन महिन्यांपासून डांबून ठेवले आहे, असा थेट आरोप मुंडेंच्या दुसऱ्या पत्नी करुणा यांनी केला आहे. पोलिसांनी सहकार्य न केल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

करुणा यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलं कि, आज माझा वाढदिवस आहे. मात्र माझ्या पतीने गेल्या ३ महिन्यांपासून माझ्या मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपवून ठेवले आहे. त्यांना माझ्याशी बोलणे आणि भेटण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे आणि हा राजकीय शक्तीचा दुरुपयोग आहे. इतका अत्याचार तर रावणाने देखील केला नसेल.

आपण २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर गेले असताना आपल्याला मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून हाकलून दिले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नसून मुलांमध्ये १४ वर्षीय मुलगीही आहे. मात्र तिच्यासाठी कोणी केअरटेकरही नाही, असे म्हणत मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करत असल्याचा गंभीर आरोपही करुणा यांनी केला आहे. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असतील असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

मला माझ्या मुलांना भेटू दिले गेले नाही, तर मी २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचे करुणा यांनी म्हटले आहे. उपोषणासाठी त्यांनी चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आझाद मैदान या ठिकाणी उपोषण करण्याची परवानगीही मागितली आहे. मुंडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत