Action will be taken against Sharjeel Usmani, Home Minister Anil Deshmukh said
महाराष्ट्र मुंबई

शरजील उस्मानीवर होणार कारवाई, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती

मुंबई : शरजील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर असून आम्ही त्याला शोधून अटक करु, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे. पुण्यात 30 जानेवारीला झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने वादग्रस्त वक्तव्य करत चिथावणीखोर भाषा वापरली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तो म्हणाला होता की, “आजचा हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी एका वर्षात 19 लोकांची हत्या केली यात सर्वजण दलित होते किंवा मुस्लिम होते. हे लोकं लिंचिंग करतात. हत्या करतात, हत्या करुन हे लोकं आपल्या घरी जातात, त्यावेळी हे लोक काय करत असावेत? काही नवीन पद्धतीन हात धूत असावेत किंवा काही औषधं मिसळून स्नान करत असावेत.”

एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजील उस्मानी विरोधात FIR दाखल

देशमुख यांनी ट्वीट करत म्हटलं कि, “पुण्यात 30 तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडीओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत