sudhir mungantiwar
महाराष्ट्र मुंबई राजकारण

एकनाथ खडसेंनी भाजपा सोडू नये अशी इच्छा – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंनी भाजपा सोडू नये अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी “ओ जानेवाले, हो सके तो लौट के आना” अशा शब्दात त्यांना भावनात्मक साद घातली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “खडसेंचा पक्षांतर्गत सुरु असलेला वाद संपेल असं मला वाटायचं, पण जे होतंय ते दुःखदायक आहे. खडसेंनी भाजपा सोडणं धक्कादायक आहे. त्यांनी जाऊ नये असं आम्हाला मनापासून वाटतं. खडसेंचा राजीनामा ही आमच्यासाठी निश्चितचं चिंतनाची बाब आहे. पण आता त्यांनी निर्णय घेतला आहे तर “खुश रहे तुम सदा ये दुवा है मेरी” हेच आम्ही म्हणू शकतो.”

मोठी बातमी: भाजपला मोठा धक्का एकनाथ खडसेंनी भाजप सोडला, राष्ट्रवादीत प्रवेश करणार: जयंत पाटील

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत