relief to punekars all shops and malls in pune will be open till 7 pm declares ajit pawar
पुणे महाराष्ट्र

पुणेकरांना मोठा दिलासा! कोरोना निर्बंध आणखी शिथिल, जाणून घ्या…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपासून (14 जून) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकाने रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल इथे कोरोना आढावा बैठक पार […]

Rules regarding Pandharpur's Ashadi Wari Palkhi announced
महाराष्ट्र

पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली जाहीर, पायी वारी सोहळा नाही

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली. यावेळी आषाढी वारीबाबत बैठकीत चर्चा झाली असून 10 महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जाहीर केलं. परंतु, पायी वारी सोहळ्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. अजित पवार म्हणाले की, “वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांसोबत […]

Doctor Have Lots Stress Due To Covid And Also Includes Harassment By Relatives Of Patients Says Bombay High Court
महाराष्ट्र मुंबई

डॉक्टरांना असा मानसिक त्रास होता कामा नये – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : ‘डॉक्टर कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात रात्रंदिवस काम करत आहेत. कित्येकांवर कामाचा प्रचंड ताण आहे. असे असताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांना स्पष्टीकरणही देत बसावे लागत असेल तर त्यांना असा मानसिक त्रास होता कामा नये’, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. डॉ. राजीव जोशी यांनी अॅड. नितीन देशपांडे यांच्यामार्फत कोरोनाविषयक याचिका तसेच […]

pune mahatma phule mandai fire
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील प्रसिद्ध ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईला आग..

पुणे : पुण्यातील महात्मा फुले मंडईच्या आतील बाजूच्या छताला आग लागल्याची घटना घडली असून या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मध्य रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई ही ब्रिटिश कालीन वास्तू असून आतील […]

malad building collapse heavy rains
महाराष्ट्र मुंबई

मालाडमध्ये तीन मजली इमारत चाळीवर कोसळून मोठी दुर्घटना, 11 जणांचा मृत्यू , 17 जण गंभीर जखमी

मुंबई : मुसळधार पावसामुळे मालाडमधील मालवणीमध्ये एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. ही घटना रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. न्यू कलेक्टर कंपाउंडमधील तीन मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला लगतच्या चाळीवर कोसळला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू  झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल […]

Mumbai High Court
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील त्या ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली? मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केला संताप

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज घरोघरी लसीकरणाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकार व मुंबई महापालिकेला फटकारले आहे. घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्यात काय अडचण आहे? असा प्रश्न न्यायालयाने विचारला. त्याचबरोबर ‘महाराष्ट्रातील त्या ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली होती? राज्य सरकारनं की मुंबई महापालिकेनं?’ याबाबत न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले. अॅड. धृती कपाडिया […]

producer of 'Balkadu' Swapna Patkar arrested
महाराष्ट्र मुंबई

‘बाळकडू’ चित्रपटाची निर्माती स्वप्ना पाटकरला अटक

मुंबई : मराठी चित्रपट निर्माती स्वप्ना पाटकर हिला अटक करण्यात आली आहे. स्वप्नाने क्लिनिकल फिजिओलॉजी या विषयात मिळवलेली पीएचडीची पदवी खोटी असल्याचं सिद्ध झालं आहे, त्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. खोटी पीएचडी पदवी दाखवून रुग्णालयात नोकरी मिळवून फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. स्वप्नाने शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘बाळकडू’ […]

Rekha jare bal bothe love Angel murder case Charge sheet File
अहिल्यानगर महाराष्ट्र

रेखा जरे हत्याप्रकरणात वेगळाच अँगल आला समोर, बदनामी टाळण्यासाठी हत्या, दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. बाळ बोठेसह सात आरोपींविरोधात साडे चारशे पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मात्र, या दोषारोप पत्रात एक वेगळाच अँगल समोर आला आहे. त्यानुसार, रेखा जरे आणि बाळ बोठे यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून ही हत्या करण्यात आली […]

महाराष्ट्र मुंबई

मुंबईत पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं, वाहतूक विस्कळीत

मुंबई : मुंबईत आज मान्सून दाखल झाला असून पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईतील दादर, हिंदमाता, सायन, माटुंगा, अंधेरी सबवे, किंग्ज सर्कल तसेच कुर्ला परिसर येथे पाणी साचले आहे. दोन ते तीन […]

discussed major issues in the state with the prime minister hope for a positive decision chief minister uddhav thackeray
देश महाराष्ट्र

मुख्यमंत्री-पंतप्रधान बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा, मुख्यमंत्र्यांनी भेटीबाबत व्यक्त केलं समाधान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गमधील जागा, जीएसटी परतावा आणि पीकविम्याच्या अटी-शर्ती, चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या किनारपट्टी भागातील नुकसानीचे एनडीआरएफचे निकष, मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. […]