पुणे : सर्वत्र कोरोनाचा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे नियम कडक करण्यात आले आहेत. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चार मोठ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने काही नियम व मार्गदर्शक सूचना […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
महाराणी छत्रपती सईबाई यांच्या समाधीस्थळ परिसर विकासाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश
मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांची राजगडाच्या पायथ्याशी समाधी असून या समाधी परिसराचा विकास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या परिसराची पाहणी करावी आणि त्याचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी आज दिले. या समाधी परिसराच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी […]
मराठी पत्रकारितेत बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू दिले आहे. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वसा आणि वारसा जतनाचे सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चितच आहे, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन केले आहे. तसेच मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. […]
‘अनाथांची मातृदेवता हरपली ..!’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली
‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण […]
कोरोनाला आळा घालायचा असेल तर गर्दी टाळलीच पाहिजे – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोनाला आळा घालायचा असेल तर गर्दी टाळलीच पाहिजे, यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टी बंद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पण राज्यात तुर्तास लॉकडाऊनची गरज नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत टास्क फोर्स आणि आरोग्य खात्याची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजेश टोपे […]
अनाथांची माय हरपली, जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (माई) यांचं निधन
पुणे : राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या, अवघं आयुष्य अनाथांच्या सेवेमध्ये झिजवणाऱ्या ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं आज निधन झालं. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज ह्रदयविकाराच्या झटक्याने […]
नितेश राणे यांना ७ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्लाप्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी ७ जानेवारीपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने न्यायालयात दिली. त्यामुळे नितेश राणे यांना ७ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. आता याप्रकरणाची […]
श्री संत चोखामेळा यांच्या भव्य स्मारक मंदिरासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार – खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड
मंगळवेढा : ‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची’ या वारीचा शुभारंभ लातूरचे माजी खासदार प्रोफ़ेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड, राष्ट्रीय अध्यक्ष विश्व दलित परिषद यांच्या हस्ते करण्यात आला. श्री संत चोखामेळा समाधी मंदिर, मंगळवेढ़ा यांच्या समाधीची पूजा करुण समतेची वारीचे उद्घाटन करण्यात आले. डॉ सुनील बळीराम गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले की मंगळवेढा ही संतांची […]
आपल्या पाल्यांना मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लस देवून सुरक्षित करा
चंद्रपूर : मेंदूज्वर या रोगामुळे दरवर्षी अनेक बालकांचा मृत्यु होतो. कोवळी बालके या आजाराला बळी पडतात. याची दखल घेवून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या 1 ते 15 वयोगटातील बालकांना मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लस देवून सुरक्षित करावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार […]
मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय, शाळा पुन्हा ऑनलाईन
मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येत्या 31 जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून […]










