Do not take Covishield and Covaxin vaccines if you have these problems
महाराष्ट्र

आपल्या पाल्यांना मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लस देवून सुरक्षित करा

चंद्रपूर : मेंदूज्वर या रोगामुळे दरवर्षी अनेक बालकांचा मृत्यु होतो. कोवळी बालके या आजाराला बळी पडतात. याची दखल घेवून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या 1 ते 15 वयोगटातील बालकांना मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लस देवून सुरक्षित करावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी केले. ब्रह्मपुरी येथे ने. ही. उच्च माध्यमिक विद्यालयात मेंदूज्वर (जॅपनीज इन्सेफेलायटिस) या जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जॅपनीज इन्सेफेलायटिस (जे.ई.) या रोगामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, 1 ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना मेंदूज्वरची लस घेणे आवश्यक आहे. आपली सुरक्षितता आपल्या हातात असून लसीपासून कोणताही धोका नाही. त्यामुळे 1 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांनी ही लस आवर्जून घ्यावी. दरवर्षी जवळपास 40 हजार बालकांना मेंदूज्वर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही लस टोचून घेतली तर मेंदूज्वर होणार नाही व आपण सुरक्षित राहू.

शासनाने ही मोहीम सुरू केली असून आजपासून या मोहिमेचा शुभारंभ झाला आहे असे जाहीर करून पालकमंत्री पुढे म्हणाले, धानाचे उत्पादन करताना निर्माण होणारे जे डास असतात ते चावल्याने मेंदुज्वर होण्याची शक्यता असते. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे धान उत्पादक जिल्हे आहे. बालकांना मेंदुज्वर होणार नाही याची काळजी सरकारने घेतली असून सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना लस द्यावी, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. तत्पुर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून लसिकरण कक्षाचे उद्धघाटन करण्यात आले.

जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदुज्वर) हा आजार प्रामुख्याने 15 वर्षाखालील मुलांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारा विषाणूजन्य आजार आहे. जे. ई आजाराचा विषाणू माणसाच्या शरीरामध्ये क्युलेक्स डासामार्फत प्रवेश करतो व त्यांनतर विविध लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात. या आजारामुळे 30 टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात. तर 40 टक्के रुग्णांमध्ये मेंदुच्या पेशी मृत झाल्यामूळे कायमचे शारीरिक व मानसिक अपंगत्व येऊ शकते. त्यामूळे 15 वर्षाच्या आतील वयोगटात अपंगत्व येण्याचे प्रमाण जास्त असते.

चंद्रपूर जिल्ह्यात 1 ते 15 वयोगटातील शहरी तथा ग्रामीण भागातील 3 लक्ष 56 हजार 313 व चंद्रपुर महानगर पालीका क्षेत्रातील 76 हजार 25 असे जिल्हातील एकूण 4 लक्ष 32 हजार 338 सर्व मुलां-मुलींना लसिकरण करण्याचे उदिष्टय आहे. ब्रम्हपूरी तालूक्यात 36 हजार 945 मुलां-मुलींना लसीकरणाचे करावयाचे असल्याने जॅपनिज एन्सेफलायटीज (जे.ई) लसिकरणामूळे मेंदूज्वर या आजारापासून बालकांचे संरक्षण होणार आहे. या लसिकरणामुळे मेंदूज्वर या आजारापासून बचाव करण्यास मदत होणार आहे. यापूर्वी हि लस पाल्यांना लावली असेल तरीसुध्दा या अभियान कालावधीमध्ये हि लस देणे आवश्यक आहे. या लसीचा कुठलाही दुष्परिणाम होणार नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत