supriya sule ajit pawar
महाराष्ट्र मुंबई राजकारण

दादांना दीर्घायुष्य लाभो, सुप्रिया सुळेंचं ट्वीट, तर समर्थकांचा कठोर होण्याचा सल्ला…

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज वेगळाच योगायोग पाहायला मिळत आहे. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही २२ जुलै हा जन्मदिवस. त्यामुळे विविध नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राष्ट्रवादीत गेल्या वर्षी जुलै महिन्यातच फूट पडली आणि अजित पवार यांनी वेगळा रस्ता निवडत सत्तेत सहभाग घेतला. गेल्या वर्षीच्या वाढदिवसावेळी शरद पवारांच्या गटात अजितदादांविषयी राग धुमसत होता, मात्र आता वर्षभरात त्यात काहीसा बदल दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि अजितदादांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!” असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यावर काही समर्थकांनी सुप्रिया सुळेंना थोडं कठोर होण्याचाही सल्ला दिला आहे.

एकीकडे अजित पवार गटातील तीन आमदारांनी शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केली असताना सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री या नात्याने दादांना दिलेल्या शुभेच्छा लक्षवेधी ठरत आहेत.

ताई पक्ष चोरला, साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केळी, DPDC च्या बैठकीत आपल्याला बोलले, साहेबांचा अपमान करण्यापर्यंत मजल गेली ह्याची. थोडं कठोर व्हायला हवं आता आपण. असं एका एक्स युजरने सुचवलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत