Police Take Action Against Four Hotels in Pune For Violating Corona guidelines
पुणे महाराष्ट्र

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील चार मोठ्या हॉटेलवर कारवाई

पुणे : सर्वत्र कोरोनाचा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे नियम कडक करण्यात आले आहेत. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चार मोठ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने काही नियम व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, मास्क अनिवार्य असून मॉल, हॉटेल व अन्य सार्वजनिक ठिकाणी दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असून काहीजण नियमांबाबत गाफील राहत आहेत. पुण्यातील काही हॉटेल्समध्ये लसीचे दोन डोस पूर्ण न झालेल्या व मास्क नसलेल्या व्यक्तींनाही प्रवेश दिला जात असल्याचं आढळून आलं. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल ड्रंक अँड पांडा, हॉटेल अजेंट जॅक, हॉटेल मेट्रो आणि हॉटेल लोकल या हॉटेलांवर कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल व्यवस्थापनाने गर्दी नियंत्रणात ठेवणे व लोकांना आवाहन करणे गरजेचे होते. मात्र, या चारही हॉटेल्समध्ये अनावश्यक गर्दी होती. त्यामुळे चारही हॉटेलच्या मॅनेजर्सवर कलम १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी जनार्दन घोडके (मॅनेजर, हॉटेल ड्रंक अँड पांडा), राम जगन्नाथ गाढवे (मॅनेजर, हॉटेल अजेंटजॅक), कुणाल दशरथ मद्रे (मॅनेजर, हॉटेल मेट्रो) आणि मारुती कोंडीबा गोरे (मॅनेजर, हॉटेल लोकल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत