ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात अतिशय दुःखद घटना घडली आहे. बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. शहरातील देवनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील देवनगर भागात एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून त्याचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी त्याची आई किचनमध्ये स्वयंपाक करत होती. […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
मुंबई : ६१ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत. या प्रदर्शनात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी रु.५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) याप्रमाणे एकूण १५ पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक […]
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘तुमच्या मोठया ताईकडून ही छोटी भेट’ हा आगळावेगळा उपक्रम…
संगमनेर : ०३ डिसेंबर २०२१, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या एका स्तुत्य उपक्रमाला ‘तुमच्या मोठया ताईकडून ही छोटी भेट’ हे आपुलकीचे शिर्षक अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी नागरे पाटील यांनी दिले. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी एक आगळावेगळा उपक्रम आखला.. या उपक्रमात गरजू मुलांना शालेय उपयुक्त वस्तू तसेच खाऊ […]
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण
अहमदनगर : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी म्हणून मी स्वत: विलगीकरणात […]
मुंबईतील घाटकोपर भागात फर्निचरच्या दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग
मुंबई : मुंबईतील घाटकोपर भागातील एका फर्निचरच्या दुकानाच्या गोडाऊनला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की असल्फा परिसरातील सुंदर बाग भागातील डिसिल्वा कंपाऊंडमध्ये असलेल्या दुकानात सकाळी 10.30 च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलिस, वॉर्ड कर्मचारी […]
मुंबईतील ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ […]
चिंता वाढली! राज्यात मागील 24 तासांत कोरोनाच्या 8067 नवीन रुग्णांची नोंद
मुंबई : महाराष्ट्रात मागील २४ तासांत ८,०६७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्याही ४५४ झाली आहे. आरोग्य विभागाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे येथे कोरोना रुग्ण संक्रमण दर वाढत आहे. आज राज्यात कोरोना […]
रुग्णसेवा देणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घ्या – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मुंबई : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 82 शिकाऊ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेची वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून या संदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करावा अशा सूचना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना देशमुख यांनी दिल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल तसेच अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवितात. कोरोनाची मोठ्या प्रमाणात […]
टाटा मॅजिक चालक-मालक संघटना व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बॅनर्स पोस्टर्स गाड्यांना लावून जनजागृती कार्यक्रम
जळगाव जिल्हा परवानाधारक टाटा मॅजिक चालक-मालक संघटना,भुसावळ, व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्यावतीने सालाबादाप्रमाणे 31 डिसेंबर आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत हे कुठलीही नशा न करता व व्यसन न करता धुंदीत नव्हे तर शुद्धी मध्ये आपल्या मुलाबाळांना सोबत साजरे करावे आणि आपल्या स्वतःचे कुटुंब व प्रवाशांचे कुटुंब हे सुरक्षित रहावे या अनुषंगाने […]
नववर्ष धुंदीत नव्हे, तर शुध्दीत साजरे करा – नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य
समाजामध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता खूपच भयानक रुप धारण करित असल्याचे दिसुन येत आहे. यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रमाण खूपच आहे. उद्याच्या पिढीला आरोग्यसंपन्न सदृढ व व्यसनमुक्त ठेवून शक्तीशाली राष्ट्र घडविण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नविन वर्षाची सुरुवात आपल्या संस्कृतीनुसार आपण आनंदाने, उत्साहाने आणि नविन वर्षाचा संकल्प ठेवून करित असतो. परंतु ३१ डिसेंबर यादिवशी अनेक तरुण स्वतःच्या […]










