समाजामध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता खूपच भयानक रुप धारण करित असल्याचे दिसुन येत आहे. यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रमाण खूपच आहे. उद्याच्या पिढीला आरोग्यसंपन्न सदृढ व व्यसनमुक्त ठेवून शक्तीशाली राष्ट्र घडविण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नविन वर्षाची सुरुवात आपल्या संस्कृतीनुसार आपण आनंदाने, उत्साहाने आणि नविन वर्षाचा संकल्प ठेवून करित असतो. परंतु ३१ डिसेंबर यादिवशी अनेक तरुण स्वतःच्या सुंदर आरोग्यमय जिवानाला काळीमा फासतात. ईतकेच नव्हे तर वर्षाच्या अखेरचा दिवस व्यसनामुळे अनेकांच्या अनमोल जिवनाचाही अखेरचा ठरतो.
३१ डिसेंबर यादिवशी अनेकजण व्यसन करणारे व पहिल्यांदाच व्यसन चाखणारे असतात म्हणुन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य च्या वतीने गुरुवार, ३० डिसेंबर २०२१ दुपारी ०३.३० वाजता १३८ बेस्ट बस स्टाँप बाहेर, कँपिटल सिनेमा समोर, सिएसएमटी स्टेशन बाहेर, सिएसएमटी, मुंबई येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नववर्ष धुंदित नव्हे तर शुध्दित साजरे करा असे प्रेमाचे नम्र आवाहन महाराष्ट्राच्या जनतेला प्राण्यांच्या माध्यमातून करण्यात आले. पृथ्वीतालावरील कोणताही प्राणी दारु पित नाही, तंबाखू खात नाही, चरस, गांजा यांचे सेवन करित नाहीत. र्निबुध्दी असलेले हे प्राणी त्यांच्या आरोग्यास तसेच त्यांच्या जमातीस अपायकारक असलेले व्यसनांच्या सेवनापासुन दुर असतात. परंतु मनुष्य प्राणी हा जगातील सर्वात बुध्दिमान असुनही तो र्निबुध्दी असल्यासारखा व्यसनांना जवळ करुन आपले व आपल्या समस्त मानव जातीचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रयत्नशिल आहे. याच मानवावर निसर्गातील प्राण्यांची ही जबाबदारी आहे.
कार्यक्रमावेळी बलुन रुपी प्राण्यांनी आम्ही कोणतेही व्यसन करित नाहीत, तुम्ही तर माणसं आहात असा उपस्थितांना संदेश दिला. यावेळी व्यसनमुक्तीची पोस्टर्स प्रदर्शनी, स्टँण्डीज हे जनतेचे लक्ष वेधुन माहिती देत होते. सेल्फी काँर्नर मध्ये उपस्थित तरुणाईने तर सेल्फी काढुन मित्र, मैत्रीणींना पाठविण्यात सहभाग घेतला.
२०२१ मध्ये मी व्यसनमुक्त राहीन अशा संकल्पाला उपस्थित लोक उस्फुर्त प्रतिसाद देत होते. एकीकडे चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढत असताना मुंबईकरांचा या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद महाराष्ट्राला नशामुक्तीकडे नेण्याचे पाऊल आहे असे मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
“नववर्ष धुंदीत नव्हे, तर शुध्दीत साजरे करा” नशाबंदी मंडळाच्या वतीने प्राण्यांचा मानवाला व्यसनमुक्तीचा संदेश आकर्षण ठरले,
- रिक्षा – Don’t Drink, Safe Drive
- सेल्फी – निश्चय केला – संकल्प पहिला – मी व्यसनांपासुन दूर
- द दारुचा नव्हे, तर द दुधाचा.
- नका खाऊ गुटखा, नका पिऊ बियर, हँप्पी न्यु ईयर, हँप्पी न्यु ईयर.