Tata Magic Driver-Owners Association

टाटा मॅजिक चालक-मालक संघटना व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बॅनर्स पोस्टर्स गाड्यांना लावून जनजागृती कार्यक्रम

जळगाव महाराष्ट्र व्यसनमुक्ती

जळगाव जिल्हा परवानाधारक टाटा मॅजिक चालक-मालक संघटना,भुसावळ, व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्यावतीने सालाबादाप्रमाणे 31 डिसेंबर आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत हे कुठलीही नशा न करता व व्यसन न करता धुंदीत नव्हे तर शुद्धी मध्ये आपल्या मुलाबाळांना सोबत साजरे करावे आणि आपल्या स्वतःचे कुटुंब व प्रवाशांचे कुटुंब हे सुरक्षित रहावे या अनुषंगाने संघटनेतर्फे नशाबंदी पर मार्गदर्शन आणि जनजागृतीपर बॅनर्स पोस्टर्स हे गाड्यांना लावून जनजागृती कार्यक्रम घेतला जातो आणि एक वेगळा समाजाला संदेश दिला जातो की आपले जीवन अनमोल आहे आणि ते आपल्या कुटुंबासाठी व देशासाठी लाख मोलाचे असून त्याचे योग्य शिस्तबद्ध पद्धतीने व शासनाच्या परिपत्रकानुसार नियमांचे पालन करून आपल्या राष्ट्रहितासाठी जतन करायचा आहे त्या अनुषंगाने संघटनेचे अध्यक्ष:- संजय पाटील, कार्याध्यक्ष:- दिनेश भंमाळे, सचिव:- चंद्रकांत चौधरी व सर्व चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित असून कार्यक्रमाच्या बॅनर चे उद्घाटन आपले भुसावळ शहराचे डीवायएसपी साहेब श्री सोमनाथ वाकचौरे साहेब व शहर पोलिस वाहतूक शाखेचे प्रमुख श्री स्वप्नील नाईक साहेब यांच्या हातून करण्यात आले प्रसंगी उपस्थित संघटनेचे पदाधिकारी चंदू पाटील, बबलू सुतार, धनराज सोनवणे, कपिल चौधरी, ज्ञानेश्वर बारी, दीपक सोनवणे, भानुदास तायडे, शरीफ पटेल, ज्ञानेश्वर कोळी, पटेल बाबा, योगेश चौधरी व व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत