संगमनेर : ०३ डिसेंबर २०२१, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या एका स्तुत्य उपक्रमाला ‘तुमच्या मोठया ताईकडून ही छोटी भेट’ हे आपुलकीचे शिर्षक अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी नागरे पाटील यांनी दिले. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी एक आगळावेगळा उपक्रम आखला.. या उपक्रमात गरजू मुलांना शालेय उपयुक्त वस्तू तसेच खाऊ देण्यात आला..
अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी नागरे पाटील यांनी सांगितले कि ‘तुमच्या मोठया ताईकडून ही छोटी भेट’ हा उपक्रम पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मालुंजे येथे साजरा केला. अडीच तास कसे गेले खरंच कळलं नाही..प्रार्थना, कविता,बडबडगीते, गोष्टी मुलांकडून वदवून त्यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचा खेळ देखील खेळले..त्यांच्यातील भीती घालवून ते स्वतःला धाडसी वृत्तीने स्वतःला कसं बोलतं करतील? स्वतःचे मत कसे मांडतील,यावर भर देत त्यांच्यासोबत त्यांच्या आवडीचे नृत्य केले..त्यांना शालेय उपयुक्त वस्तू देत त्यांच्या आवडीचा खाऊ प्रेमाने खाऊ घातला..अडीच तासांत मुलं खळखळून हसली,बेभान नाचली,निर्मळ झऱ्यासारखी मनसोक्त बागडली..मी खरंच खूप भारावून गेले..काही क्षण यांच्या आयुष्यात आपण आनंद आणू शकले. आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकलो,ही भावना आनंद देऊन गेली..मी खऱ्या अर्थी धन्य झाले..ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळाल्याने त्यांना भविष्यात प्रत्येक स्तरावर फार मदत होईल असे मला वाटते.मुलांमध्ये आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होणे गरजेचे आहे..ग्रामीण भागात शिक्षण प्रबोधनाचा प्रसार होण्याची नितांत आवश्यकता आहे,खेडोपाडी मुलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देत त्यांच्या पंखांना बळ आणि ताकद देण्याचा माझा प्रामाणिक मानस आहे.आणि त्या दृष्टीने यापुढे देखील माझी वाटचाल सातत्याने सुरूच राहील..




