Allies set the trap of Shiv Sena's death - Nitesh Rane

नितेश राणे यांना ७ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्लाप्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी ७ जानेवारीपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने न्यायालयात दिली. त्यामुळे नितेश राणे यांना ७ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारीला दुपारी २.३० वाजता होईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे नितेश राणे आठवडाभरापासून अज्ञातवासात आहेत. मात्र, आता त्यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाले आहे. न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी राणे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील नितीन प्रधान यांनी प्रकरणाची प्राथमिक माहिती न्यायालयाला दिली. मात्र, अर्जाला प्रतिज्ञापत्रावर सविस्तर उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत द्यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. त्यानंतर तोपर्यंत पोलिसांनी नितेश राणे व संदेश सावंत यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे मत प्रधान यांनी मांडले. तेव्हा पुढील सुनावणीपर्यंत पोलिसांकडून कठोर कारवाई होणार नाही, अशी हमी सरकारी वकिलांनी दिली.

भाजपचे कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जात केला आहे की ‘विधानभवनाबाहेर मी म्याव म्यावचा आवाज काढल्याने त्याला चेष्टेच्या स्वरुपात घेण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी मला लक्ष्य केले आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील सहभागापासून रोखण्याचाही सत्ताधाऱ्यांचा उद्देश होता. म्हणूनच मला शिवसेनेचे संतोष परब यांच्यावरील कथित हल्ल्याच्या प्रकरणात गोवण्यात आले आहे.’

काय आहे संतोष परब हल्लाप्रकरण?

सिंधुदुर्गमधील केनेडी रोडवर १८ डिसेंबर रोजी सकाळी ११च्या सुमारास संतोष परब हे दुचाकीवरून जात असताना मागून एका कारने त्यांना धडक दिली. त्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर त्या कारमधील एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूहल्ला केला आणि पसार झाला. यावेळी नितेश राणे व गोट्या सावंत यांना कळवायला हवे, असे हल्लेखोर स्वत:शी पुटपुटला, अशी नोंद एफआयआरमध्ये करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याच रात्री चेतन पवार, करण बाळासाहेब कांबळे, अनिल नक्का व करण दत्तू कांबळे यांना अटक केली. त्यानंतर २० डिसेंबरला दीपक वाघोडेला व २६ डिसेंबरला सचिन सातपुतेला अटक केली.

संतोष परबला किरकोळ जखमा झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रातून स्पष्ट झाले असून कणकवली न्यायदंडाधिकाऱ्यांनीही आदेशात तसे निरीक्षण नोंदवले. धडक देणाऱ्या कारने संतोषला दूरपर्यंत ढकलत नेले, असे एफआयआरमध्ये नसताना पोलिसांनी २८ डिसेंबरच्या सुनावणीत न्यायदंडाधिकारी न्यायालयात नवी माहिती मांडली. २४ डिसेंबरला आम्ही पोलिस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवला तरी पोलिसांनी आम्हाला वॉन्टेड आरोपी म्हणून दाखवले. यावरून कणकवली पोलिस दबावाला बळी पडून काम करत असल्याचे दिसत आहे, असे म्हणत राणेंनी अटकेपासून संरक्षण किंवा अर्ज प्रलंबित असेपर्यंत पोलिसांना कारवाईला मनाई करण्याची विनंती केली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत