Senior social worker Sindhutai Sapkal passed away
पुणे महाराष्ट्र

अनाथांची माय हरपली, जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (माई) यांचं निधन

पुणे : राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या, अवघं आयुष्य अनाथांच्या सेवेमध्ये झिजवणाऱ्या ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं आज निधन झालं. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

माईनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच त्यांना पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. सिंधुताईंना तब्बल 750 हून अधिक पुरस्कारांने गौरवण्यात आलं आहे.

सिंधुताईंना मिळालेले काही महत्त्वाचे पुरस्कार खालीलप्रमाणे :

  1. पद्मश्री पुरस्कार (2021)
  2. डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (2017)
  3. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2015)
  4. मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (2013)
  5. महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (2012)
  6. सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला ‘रिअल हीरो पुरस्कार’ (2012)
  7. पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’ (2012)
  8. महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ (2010)
  9. दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’ (2008)
  10. पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’
  11. आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (1996)
  12. सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
  13. राजाई पुरस्कार
  14. शिवलीला महिला गौरव पुरस्कार
  15. ‘सामाजिक सहयोगी पुरस्कार’ (1992)

सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत