मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन केलं आहे. अजित पवार यांनी ट्विट करत सांगितलं कि, “काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी […]
मुंबई
शिवसेनेच्या वकिलांनी मांडली कायदेशीर बाजू, बंडखोरांवर उद्यापासून कारवाई सुरू होणार
मुंबई : शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी रविवारी पक्षाची कायदेशीर बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले, विधानसभेच्या उपसभापतींकडे बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. बंडखोरांच्या गटाकडे बहुमत असले तरी त्यांच्यावर कारवाई होईल. पण त्यांनी आपला गट इतर पक्षांत विलिन केला तर मात्र ही कारवाई टळण्याची शक्यता असते. त्यांनी 16 बंडखोर आमदारांवर कोणत्याही […]
मविआच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे – एकनाथ शिंदे
मुंबई : मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, ”प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा..! मविआच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित आहे… आपला एकनाथ संभाजी शिंदे.” प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. […]
प्रसारमाध्यमांना बदनामी न करता FIR आणि न्यायालयीन खटल्यांचे अहवाल देण्याचा अधिकार – उच्च न्यायालय
मुंबई : एका महत्त्वपूर्ण निकालात, बदनामी न करता एफआयआर, न्यायालयीन प्रकरणे नोंदवण्याचा मीडियाला अधिकार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एफआयआर आणि न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणांची नोंद करण्याचा माध्यमांचा अधिकार कायम ठेवला आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित केलेल्या माहितीचे महत्त्व यावर जोर देऊन न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी लोकमत […]
शिवसेना तुटणे चांगले नाही, नितीन गडकरी यांचे राज्यातील राजकीय घडामोडींबाबत मोठे वक्तव्य…
मुंबई : नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की शिवसेनेचे तुटणे चांगले नाही. ते म्हणाले की, राजकारण हा खेळ आहे, सरकार बनते आणि नष्ट होते. येथे त्यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या प्रसिद्ध विधानाची पुनरावृत्ती केली की लोक येतात आणि जातात, सरकार येतात आणि जातात, ते पंतप्रधान होतात आणि नंतर ते निघून जातात […]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे रुग्णालयातून परतले घरी, शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली…
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे घरी परतले आहेत. राज ठाकरे यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, “आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माजी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली. काही वेळापूर्वीच रुग्णालयामधून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम […]
शिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबंध नाही, चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती
मुंबई : शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत व राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, भाजपाकडे सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव सादर केलेला नाही. भाजपाच्या निर्णय प्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्यांची कोअर […]
माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा, उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला खुलं आव्हान
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानावरुन शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला. आदित्य ठाकरेंसह सर्व पदाधिकारी शिवसेना भवनातून चर्चेत सहभागी झाले होते. “एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी काय कमी केलं? नगर विकास खातं दिलं. माझ्याकडची दोन खाती दिली” असा सवाल यावेळी ठाकरेंनी विचारला. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, असं खुलं आव्हान […]
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही – जयंत पाटील
मुंबई : सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.’ असं ते म्हणाले. जयंत पाटील यांनी ट्वीट केलं कि, […]









