मुंबई : मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, ”प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा..! मविआच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित आहे… आपला एकनाथ संभाजी शिंदे.”
प्रिय शिवसैनिकांनो,
नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित…. आपला एकनाथ संभाजी शिंदे.#MiShivsainik— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
महाराष्ट्रात दिवसभर अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांविरोधात आंदोलन केले. पालघर आणि ठाणे व अंबरनाथमध्ये शिंदेंच्या समर्थकांनी देखील शक्तिप्रदर्शन केले. राज्यभरात एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी बंडखोर आमदारांविरुद्ध अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून आंदोलने केली जात आहे. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर कॅम्प दोन भागात असलेल्या मध्यवर्ती कार्यालयावर देखील दगडफेक करण्यात आली आहे.




