मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान आता खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले कि, तुमचं म्हणणं आहे ना, आघाडीतून बाहेर पडा, नक्की विचार करु, पुढच्या २४ तासांत बंडखोर आमदारांनी मुंबईत यावं. तुमची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. मोबाईलवरुन, व्हॉट्सअॅपवरुन तुमच्या मागण्या मांडण्यापेक्षा समोर येऊन तुमच्या ज्या […]
मुंबई
आता इलेक्ट्रिक कारला आग! मुंबईत Tata Nexon EV ने घेतला पेट…
मुंबई : इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटनांनंतर आता इलेक्ट्रिक कारला आग लागली आहे. भारतातील सर्वाधिक विकले जाणारे इलेक्ट्रिक वाहन Tata Nexon EV ने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन ईव्ही आगीत जळताना दिसत आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यात […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना जरी कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती ठीक आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आहे. नाना पटोले यांनी माहिती दिली कि, “मुख्यमंत्री उद्धव […]
जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? पण… – संजय राऊत यांनी केला ‘हा’ दावा…
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. आमच्याकडे राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? सत्ताही परत मिळवता […]
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण
मुंबई : राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात मागील दोन दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची […]
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना धक्का, सर्वोच्च न्यायालयाचा मतदान करण्यास नकार
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता आले नाही. सध्याच्या तरतुदीनुसार तुरुंगातील व्यक्ती मतदान करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. लोकप्रतिनिधींना सूट देण्यासाठी याचिकेत उपस्थित केलेल्या कायदेशीर मुद्द्यांचा नंतर विचार केला जाईल. विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याची त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर […]
मुंबईतील 16 मजली इमारतीमध्ये भीषण आग, 11 जणांची सुखरूप सुटका
मुंबई : उत्तर मुंबईतील 16 मजली निवासी इमारतीमध्ये रविवारी लागलेल्या आगीतून 11 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. बोरीवली उपनगरात असलेल्या ‘धीरज सवेरा’ इमारतीला आग लागल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला रात्री 12.25 च्या सुमारास देण्यात आली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या 14व्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये आग लागली होती, त्यामुळे […]
महिला स्वयंपूर्ण झाल्यास राज्याची जलद गतीने उन्नती – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई : महिला स्वयंपूर्ण झाल्या तर राज्याची जलद गतीने उन्नती होण्यास मदत होणार आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करणे गरजेचे आहे असे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ाती अभियान अर्थात एमएसआरएलएमच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. योजनांविषयी जागृती […]
मराठवाडा इको बटालियनला पाच वर्षांची मुदतवाढ, वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी
मुंबई : राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात आजघडीला हे प्रमाण २० टक्के आहे. ज्या जिल्ह्यात आणि विभागात वृक्षाच्छादन कमी आहे तिथे इको बटालियनच्या सहकार्यातून वृक्षलागवड करून हरित क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न करण्याच्यादृष्टीने औरंगाबाद येथील पहिल्या इको बटालियन कंपनीस आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी तसेच अतिरक्त दोन […]
आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे पार केला आहे, या यशासाठी आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! आता पुढील शैक्षणिक वाटचालीत करिअर म्हणून वेगवेगळी क्षेत्रं खुणावत असतील. त्यामध्ये उज्ज्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक आणि […]










