गुजरातचे सुप्रसिद्ध चित्रपट संगीतकार आणि पाटण लोकसभेचे भाजपचे माजी खासदार महेश कनोडिया यांचे आज (रविवारी) निधन झाले. कनोडिया बर्याच दिवसांपासून आजारी होते. दीर्घ आजारानंतर गांधीनगरात त्यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. दीर्घ आजारानंतर संगीतकार महेश कनोडिया यांनी गांधीनगर येथील निवासस्थानी आज अखेरचा श्वास घेतला. महेश कानोदिया स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही स्वरांमध्ये गाऊ शकत […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
नेहा कक्करने स्वत:च्या लग्नात गायलं ‘मिले हो तुम हमको..’ गाणं
प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने गायक रोहनप्रीत सिंगशी २४ ऑक्टोबर रोजी दिल्लीत लग्नगाठ बांधली. आनंद कारज पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला नेहा व रोहनप्रीतचे कुटुंबीय व मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. लग्नानंतर पंजाबमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. नेहाच्या लग्नाचे विविध फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. […]
अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाला NCB ने केली अटक
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगलची चौकशी करणार्या नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोच्या पथकाने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएडसचा भाऊ अॅगिसिओस डेमेट्रिएडस याला अटक केली आहे. त्याच्याकडून एनसीबीने हशीष आणि अल्प्रझोलमच्या गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत. अमली पदार्थांच्या प्रकरणात ड्रग्ज पेडलर्सच्या अटकेमुळे अॅगिसिओलोसची ड्रग्स डीलिंगमधली भूमिका समोर आली आहे. एनसीबीने सांगितले कि, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या […]
भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांचं निधन
प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. भानू अथय्या या ९१ वर्षांच्या होत्या. भानू अथय्या यांनी भारताला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला होता. भानू अथय्या यांचे पूर्ण नाव भानुमती अण्णासाहेब राजोपाध्याय होते. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९२९ रोजी कोल्हापुरात झाला होता. त्यांनी १९५६ साली सुपरहिट सिनेमा सीआयडी साठी […]
व्हिडीओ शेअर करत धनश्री काडगावकरने दिली ‘गुड न्यूज’
छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सर्वत्र वहिनीसाहेब याच नावाने ओळखली जाते. त्यामुळे सध्या तिच्या लोकप्रियतेविषयी वेगळं काही सांगायला नको. धनश्रीने चाहत्यांना एका व्हिडीओच्या माध्यमातून तिच्याकडे असलेली गुड न्यूज सांगितली आहे. धनश्री काडगावकर लवकरच आई होणार आहे. धनश्रीने पती दुर्वेश देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये […]
ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं राहत्या घरी निधन झालं आहे. आज (८ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीमध्ये देखील काम केलं. अविनाश खर्शीकर यांनी ‘बंदिवान मी या संसारी’ या […]
दाक्षिणात्य अभिनेता टोविनो थॉमस स्टंटचं शूटिंग सुरु असताना गंभीर जखमी
दाक्षिणात्य अभिनेता टोविनो थॉमस ‘काला’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला आहे. चित्रपटातील एका स्टंटचं शूटिंग सुरु असताना त्याच्या छातीला दुखापत झाली. परिणामी अंतर्गत रक्तस्त्राव सुरु होऊन तो बेशुद्ध पडला. सध्या कोचीमधील रेनाई मेडिसीटी या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. टोविनोची प्रकृती सध्या स्थिर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. स्टंट करताना त्याच्या […]
रियाचा जामीन मंजूर, मुंबईबाहेर जाण्यास मनाई
मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने दिलासा देत जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावेळी रियाला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला असून पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन […]
अजय देवगण याचा लहान भाऊ अनिल देवगन यांचं निधन
अभिनेता अजय देवगण याचा लहान भाऊ अनिल देवगन यांचे निधन झाले आहे. भावाच्या निधनाबद्दल अजय देवगणने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपले दुःख व्यक्त केले आहे. अजय देवगणने आपला चुलत भाऊ अनिल देवगण याचा फोटो शेअर करताना लिहिले की, गेल्या रात्री मी माझा भाऊ गमावला. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंब दुःखात बुडाले आहे. अजय देवगण फिल्म्स आणि […]
रिया आणि शौविक चक्रवर्तीला २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
ड्रग केस प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने दिले. रिया आणि शौविकच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज (६ ऑक्टोबर) संपत होती. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तपास सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने रिया आणि […]










