बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेयर केली आहे. प्रीती झिंटा दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रितीने तिच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पोस्टमध्ये प्रीतीने तिच्या दोन मुलांची नावेही चाहत्यांना सांगितली आहेत. प्रिती झिंटाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या पतीसोबतच्या फोटोसह एक खास नोट शेअर करून […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा विवाहसोहळा संपन्न, दोघांनी शेअर केले लग्नातील फोटो
मुंबई : अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा विवाहसोहळा आज (१५ नोव्हेंबर) संपन्न झाला. त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी दोघांनी त्यांच्या लग्नातील सुंदर फोटो शेअर केले. राजकुमार आणि पत्रलेखा यांचा विवाह सोहळा चंदीगडमध्ये त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी एक दशकाहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर […]
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते युसुफ हुसेन यांचे कोरोनाने निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते युसुफ हुसेन यांचं निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते 73 वर्षांचे होते. युसुफ हुसैन यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. हंसल मेहता यांनी स्वत: ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. हुसेन हे निर्माते आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांचे सासरे होते. युसूफ हुसेन […]
अभिनेते पुनीत राजकुमार यांचे निधन, रुग्णालयाच्या बाहेर चाहत्यांचा आक्रोश
सुप्रसिद्ध कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पुनीत यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी 11.30 वाजता छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरुन अभिनेता राजकुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
…म्हणून समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला फटकारले
मुंबई : मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या तपासाची व्याप्ती वाढत आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात तुरुंगात आहे आणि आता अभिनेत्री अनन्या पांडेही ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर आली आहे. शुक्रवारी याप्रकरणी अनन्या पांडेची दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली, मात्र काल ती नियोजित वेळेऐवजी तीन तास उशिराने एनसीबी कार्यालयात पोहोचल्यामुळे अनन्याला फटकारण्यात आले. […]
‘रामायण’ या मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे निधन
मुंबई : ‘रामायण’ या मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे निधन झाले आहे. ‘रामायण’ मध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलियाने त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आहे. ‘रामायण’मध्ये भगवान राम यांचा बालपणीचा मित्र निषाद राजची भूमिका चंद्रकांत यांनी साकारली होती. दीपिका चिखलियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘निषाद राज’ अर्थात चंद्रकांत पंड्या यांचा फोटो शेअर […]
चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर एनसीबीचा छापा, आढळले ड्रग्स
मुंबई : चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या मुंबईच्या बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या संदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापे टाकले. याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत आणखी ७ जणांना अटक करण्यात आली होती. प्रोड्युसर इम्तियाज खत्रीच्या घरी छापा टाकत त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता 18 […]
‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन
मुंबई : लोकप्रिय मालिका ‘रामायण’मधील रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यानं मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. अरविंद त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. […]
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम नट्टू काका यांचे निधन
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील नट्टू काका यांचे निधन झाले आहे. नट्टू काकांची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. शोचे निर्माते असित मोदी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की नट्टू काका बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना […]
सोनू सूद अडचणीत! आयकर विभागाला आढळली सुमारे 250 कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता
नवी दिल्ली : आयकर विभागाकडून सोनू सूदच्या घरी आणि कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली. त्यानंतर आता आयकर विभागाला सोनू सूदच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सुमारे 250 कोटी रुपयांची अनियमितता आढळून आली आहे. सोनू सूदवर अडीचशे कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप आहे. यामध्ये त्याला चॅरिटीमध्ये मिळालेले फंड आणि बोगस करारांचा देखील समावेश आहे. विशेष गोष्ट म्हणजे सोनू सूदने […]










