Actor Arvind Trivedi passed away

‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन

मनोरंजन

मुंबई : लोकप्रिय मालिका ‘रामायण’मधील रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यानं मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. अरविंद त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला. गुजराती रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अरविंद त्रिवेदी यांनी गुजराती भाषेत धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांद्वारे जवळपास 40 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. 1987 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘रामायण’मध्ये त्यांनी दमदार कामगिरी केली. अरविंद त्रिवेदी यांनी ‘विक्रम और वेताल’ या टीव्ही मालिकेतही काम केले होते.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत