ananya panday scolded by ncb sameer wankhede on reaching late at office

…म्हणून समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला फटकारले

मनोरंजन

मुंबई : मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या तपासाची व्याप्ती वाढत आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात तुरुंगात आहे आणि आता अभिनेत्री अनन्या पांडेही ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर आली आहे. शुक्रवारी याप्रकरणी अनन्या पांडेची दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली, मात्र काल ती नियोजित वेळेऐवजी तीन तास उशिराने एनसीबी कार्यालयात पोहोचल्यामुळे अनन्याला फटकारण्यात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबई एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेला दुसऱ्या दिवशी 11 वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते, परंतु अनन्या 11 ऐवजी 2 वाजल्यानंतर एनसीबी कार्यालयात पोहोचली. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अनन्याला उशिरा आल्याबद्दल फटकारले. ते म्हणाले कि, ‘तुम्हाला 11 वाजता बोलावण्यात आलं होतं आणि तुम्ही आता येत आहात. येथे अधिकारी तुमची वाट पाहत मोकळे बसलेले नाहीत. हे तुमचे प्रॉडक्शन हाऊस नाही, हे केंद्रीय एजन्सीचे कार्यालय आहे, तुम्हाला बोलावलेल्या वेळी येत जा.

एनसीबीने शुक्रवारी अनन्या पांडेची 4 तास चौकशी केली. गुरुवारी देखील एनसीबीने या प्रकरणात अनन्याची 2 तास चौकशी केली होती. आता अनन्या पांडेला सोमवारी एनसीबीने पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. दोन्ही दिवशी अनन्यासोबत तिचे वडील चंकी पांडे होते.

अनन्या पांडेशी संबंधित तीन चॅट सर्वात महत्वाचे आहेत. 2018 ते 2019 या काळात हे चॅट गांज्याबद्दल झाले आहेत. अनन्याचे दोन्ही फोन एनसीबीने जप्त केले आहेत. जेव्हा अनन्याला प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा ती खूप गोंधळलेली दिसत होती. तिने नीट आठवत नाही असे सांगून अनेक प्रश्न टाळले. एका चॅटमध्ये आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यात गांजाबद्दल बोलणे झाले. आर्यन विचारत होता काही जुगाड होऊ शकेल का? अनन्याने उत्तर दिले – मी व्यवस्था करीन. एनसीबीने हे चॅट अनन्याला दाखवले आणि प्रश्न विचारला, ज्यावर अनन्याने उत्तर दिले की मी फक्त विनोद करत बोलत होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत