कोविड -१९ साथीने भारत सरकारने लॉकडाउनची घोषणा केली तेव्हापासून चहल सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय आहे. पण युजवेंद्र चहलने आज (८ ऑगस्ट शनिवारी) सोशल मीडियावर जाऊन नृत्यदिग्दर्शक धनश्री वर्मा यांच्याशी एंगेज असल्याची घोषणा केली. चहलने ट्विटरवर समारंभावरून पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही आमच्या कुटुंबियांसमवेत “ होय ”असे म्हटले आहे.. We said “Yes” along […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
१२ ऑगस्टला रशिया पहिल्या कोरोना लसीची नोंदणी करणार
जगभरातील अनेक वैज्ञानिक कोरोना व्हायरसवर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच जगाला कोरोनाची पहिली लस मिळण्याची शक्यता आहे. रशियाचे उप-आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी सांगितले की, रशिया 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं पहिलं वॅक्सिन रजिस्टर करणार आहे. हे वॅक्सिन मॉस्को येथील गमलेया इंस्टीट्यूट आणि रशियातील संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन तयार केलं […]
आशा सेविकांच्या संपावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा
देशातील 6 लाख आशा सेविकांनी संप पुकारला आहे. सन्मानजनक आणि वेळेवर वेतन मिळावं, त्याचबरोबर वेतन निश्चित करण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी आशा सेविकांनी संप पुकारला आहे. या मुद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे. कोरोनाचा संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून अधिकाधिक चाचण्या करण्याचं काम सुरू आहे. यासाठी आशा सेविकांची मदत घेतली जात आहे. […]
सुशील कुमार मोदी यांच्या टीकेला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचं जशास तसं उत्तर
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसशासित महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरू असून महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे. तर दुसरीकडे मुंबई पावसाच्या पाण्याने डूबते आहे, अशा शब्दात बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत सुशील कुमार मोदी यांच्या टीकेला जशास तसं उत्तर दिलं आहे. सुशील कुमार मोदीजी, जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र […]
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी मनसेनं दिली विशेष बस सेवा
आजपासून (८ ऑगस्ट) गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसेनं विशेष बस सेवा सुरु केली आहे. या बस सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. या बस सेवेला प्रारंभ झाला असून दादरमधून पहिली बस कोकणसाठी रवाना झाली. हा उपक्रम मनसे आणि महापालिका कामगार सेनेच्या वतीने राबवण्यात आला आहे. या प्रवासासाठी मनसेच्यावतीनं पॅसेंजर सेफ्टी कीट बनवण्यात आलं आहे. यामध्ये […]
ईडीकडून विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं रिया देऊ शकली नाही
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीने जवळपास 9 तास चौकशी केली. यादरम्यान, रिया चक्रवर्ती ईडीकडून विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देऊ शकली नाही. रिया मुंबईमधील ईडी कार्यालयालयात भाऊ शौविकसोबत गेली होती. दरम्यान, यात रियाच्या मुंबईस्थित दोन फ्लॅटचीदेखील चौकशी करण्यात आली. हे फ्लॅटस सुशांत सिंह राजपूतच्या खात्यातून काढलेल्या पैशातून घेतल्याचं […]
केरळमध्ये एअर इंडियांचं विमान दुर्घटनाग्रस्त,14 जणांचा मृत्यू
केरळच्या कोझिकोड या ठिकाणी असलेल्या विमानतळावर रात्री 7.45 च्या सुमारास एअर इंडियाचं एक विमान लँड झालं. विमान धावपट्टीवर असतानाच हे विमान घसरलं आणि छोट्या दरीत पडलं. या दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 123 प्रवासी जखमी झाले आहेत तर 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दुबईहून कालीकत येथे येणारं एअर इंडियाचं […]
सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाने मुंबईत दोन फ्लॅट खरेदी केले
सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीने मुंबईत दोन फ्लॅट खरेदी केले होते. हे दोन्ही फ्लॅट खारमध्ये घेतले आहेत. याप्रकरणी ईडी चौकशी करणार असून ते लवकरच याविषयी रियाची चौकशी करणार आहेत,असं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. मुंबईतील खार या परिसरात अनेक उच्चभ्रु नागरिक राहत असून येथील जागेच्या आणि घराच्या किंमती प्रचंड आहेत. अशा ठिकाणी रियाने दोन […]
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत मिळेल कोरोनाची लस, सिरम इन्स्टिट्यूटने जाहीर केली किंमत
करोना संकटातून फक्त त्यावरची लस बाहेर काढू शकते. ही लस लवकरात लवकर तयार व्हावी यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर जगातल्या देशांमध्ये असलेल्या गरीबांना […]
वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी इंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा
सम आणि विषम तिथीच्या सूत्रातून अपेक्षित संततीप्राप्तीचा मंत्र सांगून अडचणीत सापडलेल्या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांच्या निर्णयाविरोधात इंदोरीकरांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना 20 ऑगस्टची तारीख दिली व खालील न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिल्याने इंदोरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. […]










