कोरोना

लक्षणे असलेल्या करोनाबधित ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल होणे बंधनकारक

ज्येष्ठ रुग्णांना कोरोनामुळे अधिक जोखीम असते, त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी पालिकेने आता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लक्षणे असलेल्या करोनाबधित ज्येष्ठ नागरिकांना करोना रुग्णालयात दाखल होणे आता बंधनकारक असणार आहे. ६० वर्षांवरील रुग्णांची प्रकृती खालावल्यानंतर उपचारासाठी धावपळ करणे योग्य नाही. वेळेत उपचार मिळावेत यासाठी रुग्णाला पालिकेच्या किंवा खासगी आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात येईल, असे पालिकेचे […]

महाराष्ट्र

पंतप्रधानांचा बाप काढणाऱ्यांना आज नीतिमत्तेची आठवण येतेय, भातखळकरांची राऊतांवर टीका

सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी एकेरीत उल्लेख केला होता. सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून राऊतांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला, यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आता तिखट शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधानांचा बाप काढणारे, अर्णब गोस्वामी यांना सभ्य भाषेत बोलण्याचा उपदेश करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा अपमान जर राज्याचा अपमान […]

देश महाराष्ट्र

पार्थ पवार यांचं राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणार ट्विट

पार्थ पवार यांनी ट्विट करत राम मंदिर निर्माणाला आपल्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पार्थ पवार यांचं ट्विट अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भूमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवासापाठी […]

कोरोना देश

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना झाली कोरोनाची लागण

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील आता करोनाची लागण झाली आहे. प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. प्रणव मुखर्जी यांनी रुग्णालयात गेले तेव्हा करोना चाचणी केली होती. प्रणव मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटलं, मी एका दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला करोनाची लागण झाली असल्याचं आढळलं. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या […]

ग्लोबल देश

‘या’ ३२७ वस्तूंची आता चीनमधून आयात करण्याची गरज नाही

भारत-चीन व्यापारामध्ये मोठया प्रमाणावर असमतोल आहे. आपण चीनकडून आयात करतो त्या तुलनेत चीनला निर्यात करत नाही. व्यापारामध्ये अनेक वस्तुंसाठी आपण चीनवर अवलंबून आहोत. हे कमी करण्यासाठी आरआयएस (संशोधन व माहिती प्रणाली) ने अभ्यास करुन काही चांगले पर्याय सुचवले आहेत. चीनकडून भारत आयात करत असलेल्या वस्तूंमधील ३२७ वस्तू यांची पर्यायी आयात शक्य आहे, तसेच भारतातही याचे […]

देश

चेन्नई मधील अमोनियम नायट्रेटचा साठा अशा प्रकारे लावला मार्गी…

मागच्या आठवड्यात बैरुत शहरात अमोनियम नायट्रेटच्या झालेल्या महाभयंकर स्फोटांपासून बोध घेत, चेन्नईतील अमोनियम नायट्रेटचा साठा मार्गी लावण्यात आला आहे. बैरुतमधील घटनेनंतर भारताच्या चेन्नई शहरातही एका गोदामामध्ये असाच काहीशे टन अमोनियम नायट्रेटचा साठा असल्याचे समोर आले होते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही चिंतेची बाब होती. चेन्नईतील स्फोटक केमिकलचा ई-लिलाव झाला असून हा साठा आता हैदराबादला पाठवण्यात येत आहे. […]

देश राजकारण

सर्व्हेनुसार लोकप्रियतेत नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील कोणता मंत्री कितव्या नंबरवर?

इंडिया टुडेने एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाबाबत जनतेने आपलं मत नोंदवलं आहे. जनतेने सर्वेक्षणात दिलेल्या मतांनुसार कोणता मंत्री कोणत्या नंबरवर आहे? कोणाला पहिला क्रमांक मिळाला आहे? बघूया… भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर- दहावा क्रमांक रामविलास पासवान- नववा क्रमांक केंद्रीय मंत्री स्मृती इराणी- आठवा क्रमांक रेल्वे मंत्री पियूष गोयल- सातवा […]

ग्लोबल

न्यूझीलंडमध्ये गेल्या १०० दिवसांपासून एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही

जगात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत चालला आहे. भारत आणि न्यूझीलंड या देशात जवळपास एकाचवेळी लॉकडाउन घेण्यात आला होता. भारतामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे पण अनलॉक होताना देशातील करोनाचा संसर्ग वेगानं होत असल्याचं समोर आलं आहे. याउलट न्यूझीलंड सारख्या छोट्या देशानं करोनावर यशस्वी मात केली आहे. trtworld च्या वृत्तानुसार, भारतासोबतच लॉकडाउन करणाऱ्या न्यूझीलंडमध्ये गेल्या १०० […]

देश

१०१ उत्पादनांच्या आयातीला स्थगिती, आत्मनिर्भर भारत अभियानासाठी राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. संरक्षण खातं आत्मनिर्भर भारत अभियानासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे. १०१ उत्पादनांची यादी तयार करण्यात आली असून या उत्पादनांच्या आयातीला स्थगिती देण्याचा निर्णय राजनाथ सिंह यांनी घेतला आहे. भारताच्या संरक्षण खात्याला मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी संधी मिळेल असं जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं त्यानंतर हा […]

कोरोना मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याना अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्याना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर नॉन कोविड कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. संजय दत्तला करोना सदृश्य लक्षणं जाणवल्यानं तातडीनं रॅपिड अॅण्टीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला असून, या चाचणी रिपोर्ट अजून आलेला […]