देश महाराष्ट्र

पार्थ पवार यांचं राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणार ट्विट

पार्थ पवार यांनी ट्विट करत राम मंदिर निर्माणाला आपल्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पार्थ पवार यांचं ट्विट

अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भूमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवासापाठी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत. राम जन्मभूमी प्रकरणातून आणखी एक मोठा धडा आपण शिकला पाहिजे. विजयात आपण विनम्र असलं पाहिजे. युक्तिवाद कितीही तर्कहीन, सदोष किंवा दुबळे असले तरीही बाबरी मशिदीविषयी एक भावना होती. जे हरले त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. त्यांचे तर्क आणि दावे पूर्णपण पराभूत झाले आहेतच, आता आपण थोडे पुढे गेले पाहिजे. आपला पराभव झाला आहे, असं ज्यांना वाटत आहे, त्यांना या विजयाच्या क्षणी आपण बरोबर घेतलं पाहिजे. आजच्या आधुनिक भारतात रामलल्ला यांना अयोध्येत हक्काचे जे होते ते मिळाले. या क्षणी रामराज्याची आठवण आपल्याला होणे साहजिक आहे. रामराज्य ही संकल्पना बापूंना प्रिया होती. रामराज्यात रामाची पूजा होत असे. कारण रामराज्यात प्रत्येक मनुष्यमात्र नव्हे तर प्राणीमात्रालाही सन्मानाने वागवलं जात असे. “जय श्री राम”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत