sushant father kksingh
मनोरंजन

रिया माझ्या मुलाला विष खाऊ घालत होती, सुशांतच्या वडिलांचा आरोप

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये अमली पदार्थां (drugs )संदर्भात धक्कादायक खुलासा झाला. रियाच्या फोन मधून अमली पदार्थांसंदर्भातले मेसेज समोर आले आहेत. त्यात ती अमली पदार्थांचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती सुशांतला विष खाऊ घालत होती असा धक्कादायक आरोप केला आहे. “मागील बऱ्याच काळापासून रिया माझ्या मुलाला विष खाऊ घालत […]

mahad building rescue completed
महाराष्ट्र

महाड इमारत दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू, तब्बल ४० तासांनी बचावकार्य पूर्ण

महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत कोसळल्याची घटना २४ ऑगस्टला संध्याकाळी घडली. या दुर्घटनेतील मदत व बचावकार्य पूर्ण झाले असून दुर्घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला. यात ७ पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्यातून नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे, ज्यात पाच पुरुष, तीन महिला आणि एक […]

devendra fadanvis BJP
महाराष्ट्र राजकारण

अनलॉक बाबत राज्य सरकारचे निर्णय गोंधळाचे आणि विसंगतीपूर्ण- देवेंद्र फडणवीस

खासगी गाड्यांतून प्रवासासाठी ई पासची अट कायम ठेवण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारला टोला लगावला. “ई पासचं औचित्यच आता संपलंय. लोक मीम्स आणि व्यंग बनवू लागलेत,” असं फडणवीस म्हणाले. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाबाबत चर्चा करण्यासाठी विधान भवनात मंगळवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्या बैठकीनंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील अनलॉक बाबत […]

sadabhau khot
महाराष्ट्र

सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदाभाऊ यांनी स्वत: याबाबत फेसबुकवर माहिती दिली आहे. सदाभाऊ खोत यांच्या विकासनिधीतून सोमवारी (24 ऑगस्ट) शिराळा तालुक्याच्या आरोग्य विभागास कोव्हिड विलगीकरण कक्षासाठी 20 बेड्स आणि इतर सामग्री देण्यात आली होती.

महाराष्ट्र राजकारण

काँग्रेसला लॉटरी लागली, मात्र त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही- भाजप खासदार सुजय विखे

“काँग्रेस हा चौथ्या नंबरचा पक्ष असून त्यांना लॉटरी लागली. मात्र लॉटरी लागूनही त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही,” असा टोला भाजपचे खासदार सुजय विखे यांनी लगावला आहे. तसेच तीन पक्षांच्या सरकारमध्ये सर्वांचं समाधान करणे अवघड असते. तसेच ज्या खात्याचा मंत्री त्याच पक्षाचे काम होते. त्यामुळे बाकीचे नाराज होतात, असेही सुजय विखे म्हणाले. हे सर्व स्वार्थासाठी एकत्र […]

JEE NET EXAM
देश शैक्षणिक

नीट आणि जेईई (NEET and JEE) मुख्य परीक्षा निर्धारित वेळेतच होणार

NEET and JEE : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, जेईई परीक्षा एक ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईई मुख्य परीक्षांसाठी नंबर ऑफ शिफ्ट्स देखील वाढवल्या आहेत. आधी या परीक्षेसाठी आठ शिफ्ट निश्चित केल्या होत्या. आता त्या वाढवून 12 केल्या आहेत.जेईई आणि नीट परीक्षांसाठी […]

congress minister sachin sawant
राजकारण

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपच्या नेत्यांनी चायनीज ऍप वापरल्याचं केलं उघड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 जून रोजी भारतात 59 चायनीज ऍप्सवर बंदी घातली. भारतात चायनीज ऍप्सवर बंदी घातल्यानंतर आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत, भारतात नवीन ऍप्स तयार करण्यात येत आहेत. नरेंद्र मोदींनी चायनीज ऍप्स बॅन केल्यानंतरही भाजपच्या नेत्यांकडून चायनीज ऍपचा वापर केला जात असल्याचं काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उघड केलं व भाजपवर जोरदार टीका केली […]

mahavikasaghadhi government maharashtra
महाराष्ट्र राजकारण

निधी वाटपावरून काँग्रेसकडून राष्ट्रवादीवर पक्षपाताचा आरोप, शिवसेनेने झटकले हात

विकास निधीचे समान वितरण होत नसून विकास निधीवर राष्ट्रवादीने डल्ला मारला, असं काँग्रेस आमदारांचं म्हणणं आहे. त्याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा काँग्रेसच्या ११ आमदारांनी दिला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेस आमदारांच्या या भूमिकेचा समाचार घेण्यात आला आहे. ‘काँग्रेसचे आमदार उपोषणाला बसणार असतील तर तो काँग्रेसचा प्रश्न आहे. त्यांच्या या भूमिकेमुळं विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळणार आहे. शिवाय, […]

worlds fastest runner usain bolt
क्रीडा ग्लोबल

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टची करोना चाचणी पॉझिटिव्ह

जगातील सर्वात वेगाने धावणारा धावपटू उसेन बोल्ट याची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बोल्टला करोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. तरी त्याने स्वत:ला आयसोलेट केले आहे. गेल्या आठवड्यात बोल्टने त्याचा ३४वा वाढदिवस जल्लोषात साजरा केला होता. या वाढदिवसाच्या पार्टीत त्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. पार्टीत मास्कचा वापर केला गेला नव्हता. शनिवारी त्याचा वाढदिवस झाल्यानंतर त्याची […]

Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe
कोरोना नागपूर

नागपूर महापिलाका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

नागपूर महापिलाका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे ही  माहिती दिली आहे. मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमामे मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मागील १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. आपण […]