महाराष्ट्र राजकारण

काँग्रेसला लॉटरी लागली, मात्र त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही- भाजप खासदार सुजय विखे

“काँग्रेस हा चौथ्या नंबरचा पक्ष असून त्यांना लॉटरी लागली. मात्र लॉटरी लागूनही त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही,” असा टोला भाजपचे खासदार सुजय विखे यांनी लगावला आहे. तसेच तीन पक्षांच्या सरकारमध्ये सर्वांचं समाधान करणे अवघड असते. तसेच ज्या खात्याचा मंत्री त्याच पक्षाचे काम होते. त्यामुळे बाकीचे नाराज होतात, असेही सुजय विखे म्हणाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हे सर्व स्वार्थासाठी एकत्र आले आहे. यामुळे महाराष्ट्राचा विकास थांबेल, त्यामुळे त्यांचा जो काही अंतर्गत प्रश्न आहे तो त्यांनी सोडवून घ्यावा. मंत्री समाधानी आहेत. मात्र आमदार नाराज आहे. तसेच आता एका पक्षाची नाराजी बाहेर आली आहे. मात्र पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल,” असं देखील सुजय विखे म्हणाले.

त्याचबरोबर मी कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यात फिरत आहे, काही बैठका घेतल्या त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मी माझ्या कामासाठी फिरत नाही. मी जनतेसाठी रस्त्यावर उतरून काम करत आहे. मात्र जर माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर मी तयार आहे. पण माझ्या एकट्यावरच नव्हे तर पारनेरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 300 लोकांच्या उपस्थितीत कोविड सेंटरचं उद्घाटन केलं. त्यांच्यासह उपस्थित असलेल्या 300 लोकांवरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी खासदार विखेंनी केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत