खासगी गाड्यांतून प्रवासासाठी ई पासची अट कायम ठेवण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारला टोला लगावला. “ई पासचं औचित्यच आता संपलंय. लोक मीम्स आणि व्यंग बनवू लागलेत,” असं फडणवीस म्हणाले.
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाबाबत चर्चा करण्यासाठी विधान भवनात मंगळवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्या बैठकीनंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील अनलॉक बाबत सरकारचे निर्णय गोंधळाचे आणि विसंगतीपूर्ण आहेत. टप्प्याटप्प्यानं होणाऱ्या अनलॉकच्या संदर्भात केंद्र सरकारनं काही निर्णय लागू केले आहेत. इतर राज्यांनी हे निर्णय लागू केले आहेत. मात्र, महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मग तो प्रवासाचा मुद्दा असेल किंवा अन्य मुद्दे असतील. लोक एसटीनं जाऊ शकतात पण खासगी गाडीनं जायचं असल्यास ई पास काढावा लागतो. यावर आता मीम्स, व्यंग केले जात आहे, हे फडणवीसांनी निदर्शनास आणलं.
State Government is not taking decisions and also confused on many fronts.
My interaction today with media at Vidhan Bhavan, Mumbai.
राज्य सरकारच्या धोरणांमध्ये गोंधळ आणि विसंगती सुद्धा…
विधान भवन, मुंबई येथे माध्यमांशी साधलेला संवादhttps://t.co/LRmB7AgklV pic.twitter.com/9jhbs8VlrQ— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 25, 2020




