actor arjun kapoor tests positive for covid-19
कोरोना मनोरंजन

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अर्जुन कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या संदर्भात माहिती दिली आहे.   View this post on Instagram   ?? A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on Sep 6, 2020 at 1:33am PDT अभिनेता अर्जुन कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “तुम्हाला सर्वांना सांगणे माझे कर्तव्य […]

high court rejects plea to stay final year mbbs exam
शैक्षणिक

एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षाच्या स्थगिती संबंधित महत्वाचा निर्णय

एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरू होत आहे. कोरोना संकटाचे कारण पुढे करुन ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.  मागणी फेटाळण्यात आल्यामुळे ठरल्याप्रमाणे मंगळवार, ८ सप्टेंबरपासून एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरू होत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय परीक्षेचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षेबाबत २१ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढले होते. या […]

Deepesh Sawant was arrested along with Shauvik Chakraborty and Samuel Miranda
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा पाठोपाठ दीपेश सावंत याला अटक; रियाची होणार चौकशी

मुंबई : अंमली पदार्थ प्रकरणी शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा पाठोपाठ दीपेश सावंत याला अटक, दीपेश हा अंमली पदार्थ प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईतील सातवी अटक असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती या दोघांविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम ८ क, २० ब, २७ अ, २८ आणि २९ आधारे आरोप ठेवले. यात दोषी आढळल्यास दहा […]

radhakrishn vikhe patil
महाराष्ट्र

कोरोनाचं अपयश झाकण्याकरिता राज्य सरकार घेतंय कंगनाचा आधार- आमदार राधाकृष्ण विखे

अहमदनगर: कोरोनाचं अपयश झाकण्याकरिता राज्य सरकार हे कंगना राणावतचा आधार घेत आहे अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखेपाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. कंगना रणावत हिने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कंगनावर सर्वच स्तरातून टीका होत आहेत. शिवसेनेनेदेखील कंगनावर आरोप केले तर कॉंग्रेसने थेट भाजपाच्या जे पोटात ते कंगनाच्या मुखात अशी प्रतिक्रिया दिली. कंगनाची चर्चा करण्यापेक्षा […]

corona vaccine
कोरोना ग्लोबल

2021 च्या मध्यापर्यंत जगभरात कोरोनावरची लस दिली जाऊ शकते- WHO

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, 2021 च्या मध्यापर्यंत जगभरात कोरोनाची लस दिली जाऊ शकते. डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्वामीनाथन म्हणाल्या कि, ही लस 2021 च्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या तिमाहीत जगभरातील सर्व देशांमध्ये पोहोचू शकेल. हे या आधारे निश्चित केले आहे की जगभरातील तिसऱ्या टप्प्यात […]

India-china
ग्लोबल देश

मॉस्को येथे भारत आणि चीन शिष्टमंडळांची २ तास २० मिनिटे चर्चा

रशियाची राजधानी मॉस्को येथे शांघाय को-ऑपरेशनच्या बैठकीच्या निमित्ताने भारत आणि चीनच्या शिष्टमंडळांची एक बैठक झाली. दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी आपापल्या शिष्टमंडळांचे नेतृत्व केले. ही बैठक २ तास २० मिनिटे सुरू होती. बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव दूर करण्यावर चर्चा झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न […]

congress rahul gandhi
देश राजकारण

‘कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खासगीकरण’ हा मोदी सरकारचा विचार- राहुल गांधी

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मागील काही दिवसांपासून मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी मोदी सरकारच्या नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊन अशा अनेक निर्णयांना लक्ष्य केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारी कार्यालयातील नव्या नोकर भरतीवरील स्थगितीवर भाष्य केलं आहे. राहुल गांधी म्हणाले, “मोदी सरकारचा विचार ‘कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खासगीकरण’ असा आहे. कोव्हिड फक्त […]

PM narendra modi
देश

‘सिंघम’ सारखा दिखावा करू नका, कर्तव्य पार पाडा- पंतप्रधान मोदी

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमी येथे भारतीय पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थ्यांसमवेत दीक्षांत परेड सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य करताना कोणत्याही गैरकृत्यात सामील होवू नका, असा सल्ला दिला. नवीन ड्यूटी जॉईन केलेले काही अधिकारी ‘सिंघम’ सारख्या चित्रपटांपासून प्रभावित होतात आणि दिखावाच जास्त करतात. लोकांनी आपल्याला घाबरलं […]

corona virus
कोरोना देश

मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ नवे करोनाबाधित रुग्ण,करोनाबाधितांची संख्या ४० लाखांच्या पुढे

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि प. बंगालमध्ये करोनाबाधित रग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाख २३ हजार […]

china
देश

अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याची माहिती

भारत आणि चीनदरम्यान तणावाचं वातावरण आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. अजूनही एकीकडे चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहेत. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याचा दावा काँग्रेसचे आमदार निनाँग एरिंग यांनी केला आहे. […]