high court rejects plea to stay final year mbbs exam
शैक्षणिक

एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षाच्या स्थगिती संबंधित महत्वाचा निर्णय

एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरू होत आहे. कोरोना संकटाचे कारण पुढे करुन ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.  मागणी फेटाळण्यात आल्यामुळे ठरल्याप्रमाणे मंगळवार, ८ सप्टेंबरपासून एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरू होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय परीक्षेचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षेबाबत २१ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढले होते. या परिपत्रकानुसार एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या राज्यातील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर हजर राहून परीक्षा देण्याचे बंधन आहे. कोरोना संकटात परीक्षा केंद्रावर जाण्याच्या निमित्ताने संसर्ग पसरण्याचा धोका आहे, असा मुद्दा उपस्थित करत आठ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने विद्यार्थ्यांची मागणी फेटाळली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत