Schedule of 10th and 12th practical exams announced

मोठी बातमी : 10 वी आणि 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

शैक्षणिक

CBSE Practical Exam Dates 2021 : सीबीएसई बोर्डाने माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. बोर्डाने सर्व शाळांना जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सर्व शाळा 1 मार्च ते 11 जून 2021 दरम्यान दहावी आणि 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षा घेतील. सीबीएसईने सर्व शाळांना 11 जून पर्यंत प्रोजेक्ट असाइनमेंट / इंटर्नल असेसमेंट (अंतर्गत मूल्यांकन) पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत आणि हे सर्व गुण लवकरात लवकर बोर्डाच्या वेबसाईटवर अपलोड करावे लागतील.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

CBSE बोर्डाने दहावी व बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षांसाठी अनेक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शाळांना प्रॅक्टिकल किंवा अंतर्गत मूल्यांकन करताना निर्धारित जास्तीत जास्त गुणांची काळजी घ्यावी लागेल. दोन्ही वर्गांच्या वेगवेगळ्या विषयांसाठी जास्तीत जास्त 20 गुण निर्धारित करण्यात आले आहेत. तथापि, एनसीसीसाठी जास्तीत जास्त 30 गुण आहेत. विद्यार्थी सीबीएसई प्रॅक्टिकल परीक्षेचे वेळापत्रक आणि मार्क्सची माहिती बोर्डाच्या नोटीसमध्ये बघू शकतात.

प्रॅक्टिकल परीक्षेदरम्यान कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता CBSE ने अनेक महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी तसेच सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल. सर्व सूचनांसाठी cbse.gov.in या लिंकवर जा.

मुख्य सूचना खालीलप्रमाणे :

  1. प्रत्येक बॅचच्या प्रॅक्टिकल परीक्षांच्या नंतर प्रयोगशाळा 1% सोडियम हायपोक्लोराइट ने सॅनिटाईझ करावी लागेल.
  2. सॅनिटायझर प्रयोगशाळेत उपलब्ध करून द्यावं लागेल.
  3. लॅबमध्ये झाकलेल्या कचराकुंड्या उपलब्ध असाव्यात आणि त्या वेळोवेळी साफ करणे आवश्यक आहे.
  4. 25 विद्यार्थ्यांचा गट दोन भागात विभागला जाऊ शकतो.
  5. विद्यार्थ्यांना मास्क घालावे लागतील. वारंवार हात धुवावे लागतील तसेच सोशल डिस्टंसिंगचे अनुसरण करावे लागेल.

शाळांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास सीबीएसई बोर्डाने शाळांकडून 50 हजार रुपये दंड आकारण्याची घोषणा केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत