एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार असल्याची घोषणा जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. एकनाथ खडसे यांनी सकाळी पक्षाचा राजीनामा दिला अशी माहिती मिळाली असून त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं. दरम्यान खडसेंच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हटले, खडसेंच्या राजीनाम्याविषयी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
एकनाथ खडसेंनी भाजपा सोडू नये अशी इच्छा – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंनी भाजपा सोडू नये अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी “ओ जानेवाले, हो सके तो लौट के आना” अशा शब्दात त्यांना भावनात्मक साद घातली. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार […]
मोठी बातमी: भाजपला मोठा धक्का एकनाथ खडसेंनी भाजप सोडला, राष्ट्रवादीत प्रवेश करणार: जयंत पाटील
मुंबई : भारतीय जनता पक्षाला आज (बुधवार) एक मोठा धक्का बसला आहे. कारण की, त्यांचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिली. जयंत पाटील म्हणाले की, “एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला […]
महाराष्ट्रात एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांत तर दोन व तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांत मिळणार
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या मास्कचे दर नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाजवी दरात मास्क उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य झाले आहे. महाराष्ट्रात एन ९५ मास्क दर्जानुसार १९ ते ४९ रुपयांत तर दोन पदरी आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना उपलब्ध होणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे […]
BSNL युजर्सना १३५ च्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरवर मिळणार जास्त फायदा
BSNL युजर्ससाठी कंपनीने घोषणा केली आहे की, २१ ऑक्टोबर पासून १३५ च्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरवर मिळणारा फायदा आता वाढवला आहे. ज्या युजर्संना सध्या टॅरिफ रिचार्ज केल्यानंतर दुसऱ्या नेटवर्कवर बोलण्यासाठी ३०० मिनिटे म्हणजेच ५ तास मिळत आहे. ते आता १४४० मिनिटे म्हणजेच २४ तासांपर्यंत दुसऱ्या नेटवर्कर बोलू शकतील. तामिळनाडू राज्यात बीएसएनएल युजर्स २१ ऑक्टोबर पासून लोकल […]
पाकिस्तानात कराची विद्यापीठाजवळील इमारतीत भीषण स्फोट, 3 जण ठार
पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरात भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट कराची विद्यापीठाजवळील एका इमारतीत झाला आहे. या स्फोटात तीन जण ठार झाले असून १५ जण जखमी झाले आहेत. मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले असून जखमींना उपचारासाठी पटेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कराचीतील गुलशन-ए-इक्बाल या भागातील चार मजली इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर […]
नंदुरबारमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, पाच ठार, ३५ जखमी
नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळल्याने घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य युद्ध पातळीवर काम करत असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ वर नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात खासगी बस पुलावरुन दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला आहे. […]
पोलीस स्मृती दिन : करोनाविरुद्धच्या लढाईत आत्तापर्यंत ३४३ पोलीस अधिकारी-कर्मचारी शहिद
गृहमंत्री अमित शहा यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त दिल्लीतील ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’वर श्रद्धांजली अर्पण केली. करोनाविरुद्धच्या लढाईत आत्तापर्यंत ३४३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. अशी माहिती यावेळी अमित शहा यांनी दिली आहे. आत्तापर्यंत एकूण ३५ हजार ३९८ पोलीस कर्मचारी शहीद झालेले आहेत. हे स्मारक केवळ विटा, दगड आणि सिमेंटनं बनलेलं स्मारक नाही तर हे स्मारक […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज मराठवाडा दौरा; मदत जाहीर करणार का? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष
उस्मानाबाद : बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी म्हणजे आज उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्य़ाचा दौरा करणार आहेत. उस्मानाबादमधील परिस्थितीची पाहणी करण्याबरोबरच शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधतील. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झालं. जीवितहानी झाली असून जनावरंही दगावली आहे. जवळपास 10 हजार लोकसंख्या असलेल्या काटगावात मोठ्या प्रमाणात ऊस आणि सोयाबीनची लागवड केली जाते. […]
लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचं संकट कायम, देशवासियांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन – पंतप्रधान मोदी
दिल्ली : करोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची पूर्ण तयारी सुरु आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहचावी यासाठी सरकारची तयारी झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. करोनाविरोधातली लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोणीही निष्काळजीपणा केला तर त्यामुळे आपल्या […]










