Bus crashes into ravine in Nandurbar
महाराष्ट्र

नंदुरबारमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, पाच ठार, ३५ जखमी

नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळल्याने घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य युद्ध पातळीवर काम करत असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ वर नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात खासगी बस पुलावरुन दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला आहे. घाटातील दर्ग्याजवळ असणाऱ्या पुलावर रात्री तीन वाजेच्या सुमारास बस दरीत कोसळल्याने परिसरात मोठा आवाज झाला होता. हे सर्व प्रवासी ‘अंकल ट्रॅव्हल्स’च्या खासगी बसने जळगावहुन सुरतच्या दिशेने प्रवास करत होते. जवळपास ४० पेक्षा अधिक प्रवासी या बसमध्ये होते.

घटनेची माहीती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मदतकार्य राबवत जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालायत दाखल केले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या अपघातातील गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याने पोलिसांनी विसरवाडीहुन खासगी गाड्यांनी या जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत