Transport Minister Anil Parab inaugurated the new bus stand at Kudal

लालपरीला अधिक सक्षम करणार – परिवहनमंत्री अनिल परब

महाराष्ट्र

सिंधुदुर्गनगरी : गाव, वाड्या, वस्त्या यांना शहराशी जोडणारी. सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली, प्रामाणिक सेवा देणाऱ्या परिवहन महामंडळाच्या लालपरी एसटी बस सेवेला अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन, परिवहनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज केले. कुडाळ येथील नूतन बसस्थानकाचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कुडाळ बसस्थानक 1971 पासून कार्यरत आहे. जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकापैकी एक असे हे बस स्थानक आहे. बरीच वर्षे या स्थानकामध्ये प्रवाशांसाठी अद्ययावत इमारत असावी, अशी जनतेची मागणी होती. आज ती मागणी पूर्ण करण्यात यश आले आहे. असे सांगून परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले, कुडाळच्या बसस्थानकातील उर्वरित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील. कोरोनाच्या महामारीमुळे कुडाळ स्थानकाचे उद्घाटन व लोकार्पण झाले नव्हते ते आज माझ्या हस्ते झाले. त्यामुळे प्रवाशांची अधिक चांगली सोय झाली याचा मला आनंद आहे.

आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले, कुडाळ शहरामध्ये अद्ययावत बसस्थानक ही या शहराची गरज होती. सुमारे 1 कोटी 40 लाख रुपये खर्च करुन हे बस स्थानक उभारण्यात आले आहे. या नवीन बसस्थानकामुळे प्रवाशांची अत्यंत चांगली सोय झाली आहे. नवीन बसस्थानकामुळे कुडाळ शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. कुडाळ स्थानकासमोरील रस्ता करण्यासाठी 20 लाखांची तरतूद करण्यात आली असून हे कामही लवकरच पूर्ण होईल. त्याचबरोबर कुडाळ शहरातील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूदही करण्यात येईल, असे ते शेवटी म्हणाले.

यावेळी कुडाळ शहरातील नगरसेवक, पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, एस.टी.महामंडळातील अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत