मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना, मुंबईने या सामन्यात आपला कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली आहे. रोहित शर्माच्या जागेवर मुंबईने सौरभ तिवारीला संघात स्थान दिलं असून कायरन पोलार्ड मुंबईच्या संघाचं नेतृत्व करत आहे. रोहितसारख्या खेळाडूचं दुखापतग्रस्त होणं मुंबई इंडियन्सला परवडणारं नाही. मुंबई इंडियन्सने रोहितला झालेल्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर गेल्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ठाकरे सरकारकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर
मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या आर्थिक मदतेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे १०,००० कोटी रुपये विविध कारणआंसाठी असणार आहेत. […]
ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका
ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती मिळाली आहे. दिल्लीतील एका रूग्णालयात त्यांची अॅंजिआोप्लास्टी झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. कपिल देव भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत. कपिल देव हे भारताच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असून, त्यांनी १९८३ मध्ये भारताला पहिला विश्वचषक मिळवून दिला.
IPL 2020 : आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना
आयपीएलचा ४१ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज सायंकाळी साडेसात वाजता शारजाहमध्ये खेळला जाईल. मुंबईला हा सामना जिंकून गुण टेबलमध्ये अव्वल स्थान गाठायचे आहे. प्ले ऑफसाठी चेन्नईला उर्वरित सर्व चार सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. तसेच स्पर्धेतील उर्वरित संघांच्या कामगिरीने देखील चेन्नईचे भवितव्य निश्चित होईल. 19 सप्टेंबर रोजी चेन्नईने आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात […]
ती मी नव्हेच, खलबत्ते कधीच विकले नाही – पद्मशिला तिरपुडे
नागपूर : डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी संघर्ष करणारी महिला जिद्दीने पोलिस उपनिरीक्षक झाली ही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. संघर्ष करून ती पोलिस उपनिरीक्षक झाली. पण, तिने खलबत्ते विकले नाहीत. मी ती नाही. मी खलबत्ते, वरवंटे विकण्याचे काम कधीच केले नाही असे खुद्द पद्मशीला तिरपुडे यांनी बोलताना स्पष्ट केले. तिरपुडे या […]
उपमुख्यमंत्री अजित पवार थकवा जाणवत असल्याने क्वारंटाइन, परंतु काम सुरूच
उपमुख्यमंत्री अजित पवार थकवा जाणवत असल्याने राहत्या घऱी क्वारंटाइन झाले आहेत. मात्र ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. ते आवश्यकतेनुसार व्हीसी व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेत आहे. याशिवाय फाईल्स पुढे पाठवणे, कार्यालयीन कामं नियमित व सुरळीत सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अजित […]
हे मोदीजींच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारं वक्तव्य – संजय राऊत
सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच भाजपानं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावरून मोठं वादंग निर्माण झालं आहे. भाजपानं करोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली, याच मुद्यावरून भाजपावर जोरदार टीका होत असून, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले कि, “जिथे जिथे भाजपाचं सरकार नाही, तिथे करोनाची लस […]
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषणकरांची सुसाईड नोट सापडल्याने खळबळ
पुणे : पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बुधवारी बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांना व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गौतम […]
भारतासारखे देश जागतिक प्रदूषणाच्या विषयावर गंभीर नाहीत, डोनाल्ड ट्रम्प यांची टीका
डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात शेवटची अध्यक्षीय डिबेट आज पार पडली. या डिबेटमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, चीनमध्ये पाहा किती प्रदूषण आहे, रशियामध्ये पहा, भारताचेही उदाहरण घ्या. तिथे हवा किती खराब आहे. अमेरिकेत तसे नाही. अमेरिकेत हवा किती स्वच्छ आहे, पाणी शुद्ध आहे. अमेरिकेत कार्बन उत्सर्जनावर चांगले उपाय अवलंबले आहेत. चीन, […]
मोरॅटोरियमच्या कालावधीतील व्याजमाफीला हिरवा कंदील, सरकार कडून दिवाळीपूर्वी कर्जदारांना गिफ्ट
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाने व्याजमाफीला हिरवा कंदील दिला आहे. लवकरच याबाबत केंद्र सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात येणार आहे. कर्जहप्ते स्थगिती अर्थात मोरॅटोरियमच्या कालावधीतील व्याजावरील व्याजापासून कोट्यवधी ग्राहकांची सुटका होण्याची शक्यता आहे. कर्जदारांना हप्ते पुढे ढकलण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या व्याजावरीव व्याज माफ होण्यासाठी याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार […]










