आयपीएलचा ४१ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज सायंकाळी साडेसात वाजता शारजाहमध्ये खेळला जाईल. मुंबईला हा सामना जिंकून गुण टेबलमध्ये अव्वल स्थान गाठायचे आहे. प्ले ऑफसाठी चेन्नईला उर्वरित सर्व चार सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. तसेच स्पर्धेतील उर्वरित संघांच्या कामगिरीने देखील चेन्नईचे भवितव्य निश्चित होईल.
19 सप्टेंबर रोजी चेन्नईने आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात मुंबईला 5 विकेटने पराभूत केले. अबू धाबी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला 163 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने 19.2 षटकांत 5 गडी राखून 166 धावा करुन सामना जिंकला.
शारजाहमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे स्पिनर्सनाही खूप मदत होईल. शारजाहमध्ये नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.
आयपीएलमध्ये चेन्नईचा सर्वाधिक सक्सेस रेट 59.48% आहे. सीएसकेने आतापर्यंत एकूण 175 सामने खेळले आहेत. 103 सामने जिंकले आणि 71 सामने गमावले. एक सामना अनिश्चित होता. मुंबईचा सक्सेस रेट 58.67% आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 196 सामने खेळले आहेत. 115 सामने जिंकले आणि 81 सामन्यांत पराभूत झाले.




