मुंबई : राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना करोनावरील लस देणार नाही का?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी केला आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, करोना महामारीने जनता त्रस्त आहे. अजून करोनाची लस उपलब्ध […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं, १९ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेश : महोबा येथील १९ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. नवरात्रीच्या कार्यक्रमात दुर्गा पूजेनंतर ही तरुणी आपल्या घरी जात होती. यानंतर तीन तरुणांनी रस्त्यावरून तिचं अपहरण केलं आणि निर्जन जागी नेऊन तिच्यावरसामूहिक बलात्कार केला. पानवाडी भागात बलात्काराची घटना समोर आली आहे. आरोपी तरुणीला आपल्या घरामागील एका निर्मनुष्य ठिकाणी नेलं आणि तिच्यावर […]
मुंबईत सिटी मॉलमध्ये आग, अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सिटी मॉलला आग लागल्याची माहिती मिळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मॉलमधील सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यासोबतच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सिटी सेंट्रल मॉलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग […]
IPL 2020 : आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना
आयपीएलचा 40 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये संध्याकाळी ७.30 वा. रंगणार आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांसाठी विजय अत्यावश्यक आहे. हैदराबाद आतापर्यंत नऊ सामने खेळला आहे. पॉईंट टेबलमध्ये सामन्यांत सहा गुण मिळवून सातव्या स्थानावर आहे. तर राजस्थान 1o सामन्यांत आठ गुण मिळवून सहाव्या स्थानावर आहे. मागील सामन्यात राजस्थानने […]
मेडीक्लेमची आवश्यकता का? मेडीक्लेमचा वापर करताना…
मेडिक्लेम : आजार, नैसर्गिक आपत्ती, अपघात यावेळी समाज, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रशासन आपल्या मदतीला येते. परंतु अशा पद्धतीने होणारी मदत ही शाश्वत नसते. सामान्य माणसाच्या आयुष्याची दुर्दशा होते. त्यासाठी प्रत्येकाने स्वतः चा, कुटुंबाचा मेडिक्लेम इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे. मेडिक्लेम पॉलिसी का काढतो? आपल्याला एखादा आजार झाला तर त्यावरील उपचारांचा खर्च आपल्याला परत मिळावा म्हणून आपण […]
देशातील गोदामात अतिरिक्त धान्य, मग बालकांचा उपासमारीने मृत्यू का? -राहुल गांधी
जागतिक उपासमारी निर्देशांकाच्या यादीत भारत 94 क्रमांकावर आला आहे. यावरुन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. बालकांचा उपासमारीने मृत्यू होत आहे. देशातील धान्यांची गोदामं भरलेली असताना केंद्र सरकार असे का घडू देत आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “मोदींनी बनवलेल्या आपत्तींमुळे भारत देशाला सातत्याने […]
मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज
मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ताप येत असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमीत ठाकरे यांच्या तातडीने काही चाचण्यात केल्या गेल्या होत्या. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. परंतु खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमित ठाकरे यांच्या मलेरिया आणि इतर […]
‘नाग’ या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी
‘नाग’ या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज सकाळी पोखरण आर्मी रेंजवर वॉरहेड वापरुन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. चार किलोमीटर रेंज असलेले हे क्षेपणास्त्र खांद्यावरुन डागता येते. नाग क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी होणे म्हणजे, चार किलोमीटर पर्यंतच्या अंतरासाठी भारताला आता इस्रायल, अमेरिकेकडून क्षेपणास्त्र आयात करण्याची गरज […]
राज्यात सीबीआयला तपासबंदी करण्याचा निर्णय योग्यच – संजय राऊत
राज्यातील प्रकरणांच्या तपासास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ला असलेली सरसकट अनुमती मागे घेत राज्य सरकारने सीबीआयला तपासबंदी केली आहे. राज्याच्या गृहविभागाने याबाबत बुधवारी आदेश काढला. सीबीआय आता राज्यात सरकारच्या परवानगी शिवाय तपास करु शकणार नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून सरकारचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. “मुंबई पोलिसांनी […]
धक्कादायक : करोना लसीच्या चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू
ब्राझील : ब्राझीलमध्ये अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीच्या मानवी चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, असे ब्राझीलची आरोग्य यंत्रणा अनविसाने बुधवारी सांगितले. स्वयंसेवकाचा मृत्यू झाला तरीही लस चाचणी थांबणार नसल्याचे ब्राझीलने स्पष्ट केले आहे. क्लिनिकल ट्रायल म्हणजे मानवी चाचणीच्या सुरक्षिततेबद्दल कुठलाही शंका नाहीय, असे ऑक्सफर्डचे म्हणणे आहे. मागच्या महिन्यात ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला लशीचे […]










