दौंड : दौंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरील फुडीज प्लाझा या उपहारगृहात सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास मोठी आग लागली, क्षणार्धात त्याचा भडका झाला परंतु सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीची झळ रेल्वे स्थानकाच्या पत्र्याला बसली आणि पत्र्यावर ठेवलेल्या पुठ्ठ्याच्या रिकाम्या खोक्यांना आग लागल्याने आग पसरली. उपहारगृह चालकाकडे आग विझविण्यासाठीचे उपकरण […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पंकजा मुंडेंचा सरकारवर हल्लाबोल, अनेक वर्षे सत्ता, तरीही मराठा आरक्षण देता आलं नाही
औरंगाबाद : पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. त्या म्हणाल्या कि राज्यात अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही. त्या पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या भाजप उमेदवार शिरीष बोराळकरच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या. औरंगाबादमध्ये विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर, भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी […]
बीड-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, वंचितच्या चार पदाधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू
बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई जवळ कार आणि ऑईल टँकरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबादकडे जात असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या चार पदाधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. लातूरचे वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा मृतात समावेश आहे. मिळालेल्या माहिती नुसार, लातूरचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे हे […]
बॉडीबिल्डरने केले सेक्स डॉलबरोबर लग्न, लग्नाची व्हिडिओ क्लिप व्हायरल
कझाकस्तानमधील युरी टोलोचको नावाच्या बॉडीबिल्डरकडे मार्गो नावाची एक सेक्स डॉल आहे, जिच्याशी त्याने नुकतेच लग्न केले आहे. टोलोचको आणि मार्गोच्या लग्नाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर जोरदार चर्चा देखील सुरु आहे. View this post on Instagram A post shared by OddJack / Юрий Толочко (@yurii_tolochko) वृत्तानुसार, टोलोचको विवाहाचा […]
मनसेकडून वाढीव वीजबिलाविरोधात महामोर्चा, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले सक्त आदेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरामध्ये वीजबिलवाढीविरोधात महामोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांना सहकार्य करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, तोडफोड करु नका असे सक्त आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. तरीही मनसे कार्यकर्त्यांनी हातामध्ये तुमचं […]
संतापजनक : ६२ वर्षीय पुजाऱ्यानं केला चिमुकलीवर बलात्कार
६२ वर्षीय पुजाऱ्यानं १० वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं मुलीच्या घरातच हे कृत्य केलं. २४ नोव्हेंबर रोजी बंगळुरूतील देवाणहल्ली परिसरात ही घटना घडली. वेंकटरामणप्पा असं ६२ वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी मंदिरात पुजाऱ्याचं काम करतो. तो आपल्या मुलीची भेट घेण्यासाठी तिच्या घरी आला होता. देवाणहल्ली […]
अर्जेंटिनाचे प्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं निधन
अर्जेंटिनाचे माजी फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच एका अपघातामुळे मॅरेडोना यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया देखील झाली होती. त्यानंतर मॅरेडोना यांना त्यांच्या मुलीच्या घरी हलवण्यात आलं होतं. ३० ऑक्टोबर रोजी मॅरेडोना यांनी आपला ६० वा वाढदिवस साजरा केला. १९८६ साली आपल्या […]
केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केल्या नव्या गाईडलाइन्स, सक्तीने नियमांची अंमलबजावणी
गेल्या काही दिवसांत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वाढणारी कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने नमूद केलं आहे. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्या गाईडलाइन्स जाहीर केल्या आहेत. हे नियम १ ते ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहेत. गृहमंत्रालयाने सावधगिरी बाळगण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना सक्तीने नियमांची […]
बलात्कार करणार्या आरोपीला नपुंसक बनवले जाणार, पाकिस्तान सरकारने आणला अध्यादेश
पाकिस्तान सरकार बलात्कार करणार्या आरोपींविरूद्ध नवीन कायदे आणणार आहे. याअंतर्गत बलात्कार करणाऱ्या आरोपीला इंजेक्शन देऊन नपुंसक बनवले जाईल. मंगळवारी इमरान यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा कायदा करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. सरकारने बलात्काराविरोधी (अन्वेषण व चाचणी) अध्यादेश २०२० आणि पाकिस्तान दंड संहिता (दुरुस्ती) अध्यादेश २०२० ला ‘मोठा निर्णय’ असे म्हटले […]
मोबाईल क्रमांकात 1 जानेवारीपासून होणार बदल, दूरसंचार विभागाकडून परिपत्रक जारी
1 जानेवारी 2021 पासून देशात कोणत्याही लँडलाइन फोनवरुन मोबाईल नंबरवर फोन करण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल होत आहे. ट्राय (Telecom Regulatory Authority of India – TRAI) च्या आदेशानुसार लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी मोबाईल नंबरआधी शून्य हा क्रमांक डायल करावा लागेल. ट्रायने याबाबत दूरसंचार विभागाला शिफारस केली होती. दूरसंचार विभागाने ट्रायची शिफारस स्वीकारली असून टेलिकॉम कंपन्यांना एक […]










