कझाकस्तानमधील युरी टोलोचको नावाच्या बॉडीबिल्डरकडे मार्गो नावाची एक सेक्स डॉल आहे, जिच्याशी त्याने नुकतेच लग्न केले आहे. टोलोचको आणि मार्गोच्या लग्नाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर जोरदार चर्चा देखील सुरु आहे.
View this post on Instagram
वृत्तानुसार, टोलोचको विवाहाचा प्रस्ताव ठेवण्यापूर्वी ८ महिन्यांपासून मार्गाशी संबंध ठेऊन होता. लग्न करण्यापूर्वी, टोलोचको त्याच्या सेक्स डॉलमध्ये काही बदल करण्यासाठी क्लिनिकमध्ये घेऊन गेला. टोलोचको याबाबत म्हणाला कि, “जेव्हा मी तिचा फोटो जगासमोर दाखविला, तेव्हा तिच्यावर बरीच टीका झाली ज्यामुळे ती अस्वस्थ झाली, म्हणूनच आम्हाला वाटले की प्लास्टिक सर्जरी करावी. ती आता खूप बदलली आहे. सुरुवातीला हे स्वीकारणे थोडे अवघड होते परंतु नंतर मला याची सवय झाली.”