NCB issues summons to Karan Johar
मनोरंजन

ब्रेकिंग : NCB ने करण जोहरला बजावले समन्स, ड्रग्स प्रकरणात होणार चौकशी

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) चित्रपट निर्माता करण जोहर यांना समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबी करण जोहरची बॉलीवूडमध्ये पसरलेल्या ड्रग्सच्या जाळ्याबद्दल चौकशी करणार आहे. परंतु, एनसीबी कार्यालयात करण यांना कधी चौकशीसाठी हजर राहायचे हे अद्याप समजू शकलेले नाही. काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचा दुसरा फॉरेन्सिक अहवालही नकारात्मक आला. या व्हिडिओबद्दल असे […]

Accused arrested
महाराष्ट्र मुंबई

50 पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग आणि अश्लील चाळे केलेल्या आरोपीला अटक

मुंबई : मालाड पूर्व दिंडोशी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या तीस वर्षीय व्यक्तीच्या चौकशीमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. गेल्या 9 वर्षात 50 पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग केला असल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. या आरोपीला 2011 साली एका महिलेसमोर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतरही या […]

Successful launch of ISRO's PSLV50 Communication Satellite CMS01
देश

ISRO च्या PSLV50 कम्युनिकेशन सॅटेलाईट CMS01 चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : इस्त्रोने आज (गुरुवार) दुपारी 3 वाजून 41 मिनीटांनी भारताच्या नवीन कम्युनिकेशन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेशमधील सतिश धवन स्पेस सेंटरमधून करण्यात आलं आहे. CMS01 ला PSLV50 च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यासाठी बुधवार पासून 25 तासांचे काउंटडाउन सुरु होतं. CMS-01 हा भारताचा 42 वा कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. याच्या माध्यमातून भारतीय […]

central government to consider putting farm laws on hold - Supreme Court
देश

वादग्रस्त कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याबद्दल सरकारने विचार करावा – सर्वोच्च न्यायालय

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी झाली. यावेळी शेतकऱ्यांना रस्त्यावरून हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. तर दुसरीकडे न्यायालयानं आंदोलन मुलभूत अधिकार असला, तरी इतरांना त्रास व्हायला नको, असे निर्देश दिले. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे रस्ते बंद असून, त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगत काही जणांनी याचिका […]

TRP scam: Former BARC COO Romil Ramgarhia arrested
महाराष्ट्र

TRP घोटाळा : BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रोमिल रामगढिया यांची अटक ही या प्रकरणातली चौदावी अटक आहे. पहिल्यांदाच बार्क या प्रेक्षक संख्येची पाहणी करणाऱ्या संस्थेशी संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रोमिल रामगढिया हे रिपब्लिक टीव्हीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या थेट संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. बार्क BARC […]

French President Emmanuel Macro infected with corona
ग्लोबल

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांना कोरोनाची लागण

पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी सुरुवातीच्या लक्षणांनंतर कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष मॅक्रो हे पुढील सात दिवस विलगीकरणात राहतील. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं असलं तरी ते आपले काम सुरू ठेवतील. ते […]

court action needs on sanjay raut
महाराष्ट्र

न्यायालयाने काय करावं हे सांगणं दुर्दैव, संजय राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाईची गरज

मुंबई : खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य बेताल आणि बेजाबदार आहे. न्यायालयाने काय केलं पाहिजे ते संजय राऊत सांगत आहेत, हे दुर्दैव आहे. संजय राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची गरज आहे, असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. मेट्रो कारशेडचा विषय विरोधी पक्षानं राजकीय केला असून त्यात न्यायालयाने पडू नये आणि ते योग्य आहे. […]

Corona vaccine causes severe allergies in US health worker
ग्लोबल

चिंताजनक : कोरोनाची लस घेताच आरोग्य कर्मचाऱ्याला झाली गंभीर ऍलर्जी

जगभरात कोरोना लशींच्या चाचण्या सुरू आहेत. काही लस (कोरोनाव्हायरस व्हॅक्सीन) त्यांचे चांगले परिणाम दाखवत आहेत, तर काही लसींचे दुष्परिणामही आता दिसू लागले आहेत. आता यामध्ये फायझर लसीचे नावही जोडले गेले आहे. अमेरिकेच्या अलास्का शहरातील एका आरोग्य कर्मचाऱ्याला फायझरची लस घेताच त्याला अनेक प्रकारच्या ऍलर्जी होऊ लागल्या. ही ऍलर्जी अतिशय गंभीर होती. या आरोग्य कर्मचार्‍यासारखीच समस्या […]

'Aap' trolled Prime Minister Narendra Modi by sharing the video
देश

‘मास्क घाला, मोदींसारखं वागू नका’, बघा व्हायरल व्हिडीओ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील कोरोना संकट टळलं नसून काळजी घ्या असं आवाहन अनेक कार्यक्रमांमधून देशवासीयांना वारंवार करत असतात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क घेण्यास नकार देताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाने हा व्हिडीओ शेअर […]