उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वडिलांनी आपल्या तीन वर्षाच्या मुलाला निर्दयपणे मारहाण करून ठार मारले. मुलाचा दोष हा होता की त्याने वडिलांच्या अंथरुणात लघवी केली होती. घटनेनंतर आरोपीने पत्नी आणि आपल्या दोन मुलींना धमकावले की ही गोष्ट कोणाला सांगितली तर संपूर्ण कुटुंबाला ठार मारेल. हमीरपूर जिल्ह्यातील छनी खुर्द येथे राहणारा […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
SBI ने खातेधारकांना दिला ‘हा’ सावधानतेचा इशारा
मुंबई : बँकिंग फ्रॉडच्या वाढत्या घटना लक्षात घेत ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI) ने कोट्यवधी खातेधारकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. आपली वैयक्तिक माहिती प्रायव्हेट ठेवण्याची सूचना एसबीआयने ट्विटरवरुन दिली आहे. ही माहिती इतरांसोबत शेअर करताना दोन वेळा विचार करा. तरच तुमच्या बँक खात्यातील पैसे सुरक्षित राहतील. बँकिंग फ्रॉड झाल्यास सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवा, असंही एसबीआयने […]
सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, संत बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येवर राहून गांधींची प्रतिक्रिया
शीख संत बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने “क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत” त्यांनी तातडीने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत. राहुल यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘करनालच्या संत बाबा रामसिंह यांनी कुंडलीच्या सीमेवर शेतकर्यांची अवस्था पाहून […]
गप्प बसून ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं, पण.. – निलेश राणे
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल गौप्यस्फोट करत म्हटलं होतं कि, येत्या चार महिन्यात आपल्याकडचे अनेक आमदार आमच्याकडे येतील हे तुम्हाला कळणार देखील नाही. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं कि, “कोणाला घ्यावं कोणाला न घ्यावं हा तुमचा […]
‘या’ योजनांतील लाभार्थींना उत्पन्नाचा दाखला सादर करण्यास सूट
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता असते, परंतु कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेत मार्च 2021 पर्यंत उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयात दाखल करण्यास सूट देण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. या […]
1 जानेवारीपासून व्हॉट्सअॅप ‘या’ स्मार्टफोन्समध्ये काम करणार नाही
1 जानेवारी २०२१ पासून प्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा काही स्मार्टफोनमध्ये सपोर्ट बंद केला जाईल. ज्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट असणार नाही त्यात Android आणि आयफोनचा समावेश आहे. म्हणजेच, जुन्या व्हर्जनच्या सॉफ्टवेअरमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप iOS 9 आणि Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार्या स्मार्टफोनवर काम करणार नाही. iPhone 4 किंवा त्यापेक्षा जुन्या आयफोनवरून […]
रेखा जरे यांच्या हत्या प्रकरण : जिल्हा सत्र न्यायालयाने बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला
अहमदनगर : रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे बाळ बोठेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आजच्या सुनावणीत अॅड. महेश तवले यांनी बाळ बोठेच्या बाजूने युक्तिवाद केला. मात्र, सत्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. बाळ बोठेंचे वकील महेश तवलेंनी या प्रकरणाचा हनी ट्रॅपशी संबंध जोडला. आणि हनी […]
दिलासादायक : कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी, जाणून घ्या नवे दर
कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनाने सहाव्यांदा कपात करत 980 रुपयांऐवजी 700 रु. हा दर निश्चित केल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. आरोग्यमंत्री म्हणाले कि, राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही […]
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झाली ‘ही’ ९ विधेयके
मुंबई : दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशन -२०२० मध्ये मांडण्यात आलेली विधेयके आणि त्याबाबतचा तपशील : दोन्ही सभागृहात संमत विधेयके – 9 विधान सभेत प्रलंबित विधेयके – 1 विधान परिषदेत प्रलंबित विधेयके – 0 संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके – 1 एकूण विधेयके – 11 दोन्ही सभागृहात संमत विधेयके : १) सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. […]
मोठी बातमी : कांजूर मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवा, उच्च न्यायालायाचा राज्य सरकारला दणका
कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायाने दिले आहेत. हा राज्य सरकारसाठी मोठा दणका आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर आज सुनावणी पार पडली. फेब्रुवारीत […]










