WhatsApp will not work on these smartphones From January 1
गॅझेट्स तंत्रज्ञान

1 जानेवारीपासून व्हॉट्सअ‍ॅप ‘या’ स्मार्टफोन्समध्ये काम करणार नाही

1 जानेवारी २०२१ पासून प्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा काही स्मार्टफोनमध्ये सपोर्ट बंद केला जाईल. ज्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट असणार नाही त्यात Android आणि आयफोनचा समावेश आहे. म्हणजेच, जुन्या व्हर्जनच्या सॉफ्टवेअरमध्ये व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप iOS 9 आणि Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार्‍या स्मार्टफोनवर काम करणार नाही.

iPhone 4 किंवा त्यापेक्षा जुन्या आयफोनवरून व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट काढला जाऊ शकतो. तथापि, पुढील आवृत्तीच्या आयफोनमध्ये iPhone 4s, iPhone 5s, iPhone 5C, iPhone 6, iPhone 6s मध्ये जुने सॉफ्टवेअर असल्यास ते अपडेट केले जाऊ शकतात. अपडेट झाल्यानंतर या आयफोन मॉडेल्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालवता येईल. अँड्रॉइड स्मार्टफोनविषयी सांगायचे तर Android 4.0.3 पेक्षा जुन्या व्हर्जनवर चालणार्‍या स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅपला सपोर्ट मिळणार नाही.

व्हॉट्सअॅप वेळोवेळी असे करत असते. नवीन अपडेट्स आणि सुरक्षा पॅच सतत दिले जातात. अशा परिस्थितीत, कंपनीला जुन्या व्हर्जनच्या सॉफ्टवेअरला सपोर्ट करणं शक्य होत नाही. नवीन सुरक्षा पॅचमुळे, बर्‍याचदा कंपनी जुन्या व्हर्जनच्या सॉफ्टवेअरवर चालणारे स्मार्टफोन न वापरण्याचा सल्ला देते. त्यामुळे आपल्याकडे जर जुना आयफोन किंवा अँड्रॉइड स्मार्टफोन असेल तर आपण सेटिंग्जवर जाऊन अपडेट्स चेक करू शकता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत