9 bills were passed in the winter session of the Legislature

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झाली ‘ही’ ९ विधेयके

महाराष्ट्र

मुंबई :  दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशन -२०२० मध्ये मांडण्यात आलेली विधेयके आणि त्याबाबतचा तपशील :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दोन्ही सभागृहात संमत विधेयके – 9

विधान सभेत प्रलंबित विधेयके – 1

विधान परिषदेत प्रलंबित विधेयके – 0

संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके – 1

एकूण विधेयके – 11

दोन्ही सभागृहात संमत विधेयके :

१) सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. ५४ : महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2020 (पुन:स्थापनार्थ, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(२) सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. 48 : मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2020, (मुद्रांक शुल्कात केलेल्या कपाती प्रमाणे अधिभारामध्ये कपात करण्याची तरतूद करणे) (नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 16) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(३) सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. 44 : महाराष्ट्र सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक, २०२०, (कोविडमुळे, सहकारी संस्थांमधील महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्यासाठी संचालक मंडळांना अधिकार देणेबाबतची तरतुद) (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 17 ) (पुर:स्थापित दि. 14.12.2020 विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(४) सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र.45 : महाराष्ट्र सहकारी संस्था (पाचवी सुधारणा) विधेयक, २०२०, (कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ मार्च २०२१ पर्यत घेण्यास, लेखापरिक्षण अहवाल ३१ डिसेंबर २०२० पर्यत सादर करण्यासाठी वाढ करणे व गृह निर्माण संस्थेच्या विद्यामान समितीचे संचालक हे नविन संचालक मंडळ गठीत होईपर्यत कामकाज पाहतील अशी तरतुद करणे) (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 18 ) (पुर:स्थापित दि. 14.12.2020 विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(५) सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 46 : महाराष्ट्र महानगरपालिका, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2020, (कोविडच्या पार्श्वभूमीवर नजिकच्या काळामध्ये निवडणुका न झालेल्या 12 नागरी स्थानिक संस्थामधील प्रशासकांच्या नियुक्तीच्या कालावधी 6 महिन्यापर्यत वाढविणे) (नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 19) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(६) सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. ४७ : मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2020 (कोविड-19 संसर्ग सार्वत्रिक साथ रोगामुळे सन 2020-21 मध्ये मालमत्ता करातुन सुट तसेच सवलत देण्याकरिता कलम 154 मध्ये पोट-कलम (1ड) नव्याने दाखल करण्याबाबत.) (नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 20) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(७) सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 50 : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२० (कोरोना विषाणुच्या प्रार्दुभावामुळे नवीन महाविद्यालय, नवीन पाठयक्रम, विषय विद्याशाखा अतिरिक्त तुकडी इत्यादी सुरू करण्याची परवानगी कार्यपध्दतीचे सन २०२०-२१ यावर्षी करिता नवीन वेळापत्रक विनिर्दिष्ट करणे.) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 21) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(८) सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 49 : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापुर विधेयक, 2020 (स्वयं अर्थ सहाय्य विद्यापीठ स्थापन करणे) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(९) सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 53 : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक, 2020 (आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणे) (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके :

(१) सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 51 : शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020, ( महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 व मुलांचे लैगिक गुन्ह्यांपासून प्रतिबंध अधिनियम, 2012 यामधील तरतूदींमध्ये सुधारणा करणे, नविन कलमांचा समावेश करणे, शिक्षेत वाढ करणे (गृह विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, संयुक्त समितीकडे पाठविण्याचा ठराव संमत दि. 15.12.2020).

स्थापन करण्यात आलेली २१ सदस्यीय (विधान परिषद सदस्य ७, आणि विधानसभा सदस्य १४) संयुक्त चिकित्सा समिती :

गृहमंत्री अनिल देशमुख (अध्यक्ष) सदस्य – सर्वश्री अॅड. अनिल परब, शशिकांत शिंदे, भाई जगताप, अमोल मिटकरी, भाई गिरकर, विनायक मेटे, कपिल पाटील (सर्व विधानपरिषद सदस्य). श्रीमती मनिषा चौधरी, श्रीमती देवयानी फरांदे, श्रीमती श्वेता महाले, अॅड. राहूल नार्वेकर, श्रीमती माधूरी मिसाळ, अॅड.भारती लव्हेकर, श्री. सुरेश वरपूडकर, श्रीमती प्रणिती शिंदे, श्रीमती सरोज अहिरे, श्री. जितेंद्र आव्हाड, श्रीमती यामिनी जाधव, सर्वश्री सुनिल प्रभू, दिपक केसरकर, रईस शेख (विधानसभा सदस्य).

विधानसभेत प्रलंबित विधेयके :

(१) सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 52 : महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ति कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूध्दच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, 2020 (गुन्ह्यास आळा घालणे आणि गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधरण न्यायालये निर्माण करून ३० कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे) (गृह विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत विचारार्थ दि. 15.12.2020).

विधिमंडळाचे २०२१ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्च २०२१ पासून बोलाविण्यात येणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत