मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल गौप्यस्फोट करत म्हटलं होतं कि, येत्या चार महिन्यात आपल्याकडचे अनेक आमदार आमच्याकडे येतील हे तुम्हाला कळणार देखील नाही. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं कि, “कोणाला घ्यावं कोणाला न घ्यावं हा तुमचा प्रश्न आहे. पण इतक्या पलटी मारून सुद्धा मान वर करून फिरणाऱ्याला मी मराठा मानत नाही. गप्प बसून ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं. पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो?”
कोणाला घ्यावा कोणाला न घ्यावा हा तुमचा प्रश्न आहे पण इतक्या पल्ट्या मारून सुद्धा मान वर करून फिरणाऱ्याला मराठा मी मानत नाही. गप्प बसून ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद भोगलं असतं तर काय वाटलं नस्त पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो?? https://t.co/EDCgVAz3u8
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 16, 2020