कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील कोरोना संकट टळलं नसून काळजी घ्या असं आवाहन अनेक कार्यक्रमांमधून देशवासीयांना वारंवार करत असतात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क घेण्यास नकार देताना दिसत आहेत.
आम आदमी पक्षाने हा व्हिडीओ शेअर केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रोल केलं आहे. व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी यांना स्टॉल लावलेली व्यक्ती मास्क घेण्याचा आग्रह करताना दिसत आहे. मात्र, वारंवार आग्रह करुनही मोदी मात्र मास्क घेण्यास नकार देताना व्हिडीओत दिसत आहे. आम आदमी पक्षाने व्हिडीओ शेअर करताना, ‘मास्क घाला, मोदींसारखं वागू नका’ अशी उपहासात्मक टीका केली आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याचा उल्लेख व्हिडीओत केलेला नाही.
Wear a mask. Don’t be like Modi ji. pic.twitter.com/lPxdTEdZiI
— AAP (@AamAadmiParty) December 17, 2020




