TRP scam: Former BARC COO Romil Ramgarhia arrested
महाराष्ट्र

TRP घोटाळा : BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रोमिल रामगढिया यांची अटक ही या प्रकरणातली चौदावी अटक आहे. पहिल्यांदाच बार्क या प्रेक्षक संख्येची पाहणी करणाऱ्या संस्थेशी संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रोमिल रामगढिया हे रिपब्लिक टीव्हीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या थेट संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बार्क BARC म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ही टीव्ही चॅनेल्सची प्रेक्षकसंख्या मोजणारी संस्था आहे. या संस्थेनेच सुचवल्यावरुन मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरु केला होता. त्या बार्क संस्थेच्या माजी कार्यकारी प्रमुखाला म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरला अटक करण्यात आलीय. मुंबई पोलिस आयुक्तांनी ऑक्टोबर महिन्यात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ईडीने सुद्धा या प्रकरणी चौकशी सुरु केली होती.

रोमिल रामगढिया यांनी जुलै 2020 मध्ये बार्कमधील सीओओ पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा बार्कमधील कार्यकाल हा तब्बल सहा वर्षांचा होता.

या घोटाळ्याप्रकरणी सर्वात आधी अटक करण्यात आलेले हंसा रिसर्चचे कर्मचारी ज्या घरात पीपल मीटर बसवण्यात आलं आहे, त्यांना ठराविक चॅनेल पाहण्यासाठी पैसे देत असल्याचा आरोप पोलिसांनी तपास केल्यानंतर केला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत