मुंबई : खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य बेताल आणि बेजाबदार आहे. न्यायालयाने काय केलं पाहिजे ते संजय राऊत सांगत आहेत, हे दुर्दैव आहे. संजय राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची गरज आहे, असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
मेट्रो कारशेडचा विषय विरोधी पक्षानं राजकीय केला असून त्यात न्यायालयाने पडू नये आणि ते योग्य आहे. अशी टीका करतानाच राऊत यांनी न्यायालयाच्या कामकाजावर टिपण्णी केली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘संजय राऊत यांनी न्यायालयावर टीका करत न्यायालयाने काय करावं असं मार्गदर्शनच ते करु लागले आहेत. हा एक प्रकारे न्यायालयावरील अविश्वास असून हे लोकशाहीसाठी घातक आहे. न्यायालय कोणत्याही सरकारच्या आदेशावर चालत नसतं. कोर्टावर कोणताही आरोप करणं म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळं राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची गरज आहे,’ असं दरेकर म्हणाले.
‘सामनाच्या अग्रलेखातून बेजबाबदार टीका केली तसंच, नेत्यांवर आक्षेप घेतले ते आपण राजकीय टीका-टिप्पणी म्हणून समजून घेऊ. परंतु, या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायव्यवस्था केली आहे. या न्यायव्यवस्थेच्या बाबतीत असे आक्षेप घेतले जात असतील तर यापेक्षा दुर्देव काय असू शकतं. त्यामुळं यात न्यायव्यवस्थेनं दखल घेण्याची गरज आहे,’ अशी मागणी त्यांनी केली.
खासदार @rautsanjay61 अहंकारातून बोलतं असून,अत्यंत बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य करत आहेत.न्यायालयाने काय केलं पाहिजे? हे ते सांगतायत. जो की न्याय व्यवस्थेवरचा अविश्वास आहे. तसेच राज्यात अघोषित आणीबाणी असताना लोकशाहीसाठी हा प्रकार घातक आहे. @BJP4Maharashtra @TV9Marathi @TheMahaMTB pic.twitter.com/tC9gxmn6W8
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 17, 2020