Successful launch of ISRO's PSLV50 Communication Satellite CMS01

ISRO च्या PSLV50 कम्युनिकेशन सॅटेलाईट CMS01 चे यशस्वी प्रक्षेपण

देश

श्रीहरिकोटा : इस्त्रोने आज (गुरुवार) दुपारी 3 वाजून 41 मिनीटांनी भारताच्या नवीन कम्युनिकेशन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेशमधील सतिश धवन स्पेस सेंटरमधून करण्यात आलं आहे. CMS01 ला PSLV50 च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यासाठी बुधवार पासून 25 तासांचे काउंटडाउन सुरु होतं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

CMS-01 हा भारताचा 42 वा कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. याच्या माध्यमातून भारतीय मुख्य भूमीसोबतच अंदमान- निकोबार आणि लक्षद्विप ही बेटंही कव्हर करण्यात येणार आहेत. हा उपग्रह सात वर्षापर्यंत काम करेल असं सांगण्यात आलं आहे. PSLV-C50 या 44 मीटर उंचीच्या सॅटेलाईटमध्ये चार स्टेजच्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे प्रक्षेपण PSLV या प्रकारातले 22 वे यशस्वी प्रक्षेपण आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत