केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात कंपन्यांना दिलासा देण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल केले होते. या बदलांच्या पार्श्वभूमीवर काही कंपन्यांनी मनमानी कारभार सुरु केला. कंपन्यांनी या कायद्याचा संदर्भ देत पर्मनन्ट नोकरदारांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये बदलण्यास सुरुवात केली. मात्र आता अशा कंपन्यांना सरकारनेच इशारा दिला आहे. नवीन कर्मचारी कायद्यानुसार कोणतीही कंपनी कोणत्याही पर्मनन्ट कर्मचाऱ्याला कॉन्ट्रॅक्टवर ट्रान्सफर करु शकत नाही असं […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मनात शंका असेल तर.. कांजूर कारशेडबाबतच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी कांजूर कारशेडबाबतच्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे. याला ट्विटच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील सर्व महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं कि, मनात शंका असेल तर आज आरे कारशेडला जी जागा […]
शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बुलडाणा : जम्मू काश्मिर मधील द्रास भागात लाईन ऑफ मेंटेनन्स करीत असताना हिम वादळामुळे हिमकडा अंगावर कोसळून बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेडा चक्का येथील जवान प्रदीप साहेबराव मांदळे 15 डिसेंबर रोजी शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव लेह, दिल्ली, मुंबई हवाई मार्गे औरंगाबाद येथे काल 19 डिसेंबर रोजी सायंकाळी आणण्यात आले. औरंगाबाद येथे विमानतळावर लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील सर्व महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या
मुंबई : आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं ते म्हटले. मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून अंमलात आणत गेलात, त्यामुळे आपण नियंत्रण मिळवले आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]
शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील जवान प्रदीप मांदळे हे कर्तव्यावर असताना काश्मीरमधील द्रास सेक्टरमध्ये गेल्या हिमस्खलनात शहीद झाले. कारगील व द्रास भागातील हवामान खराब असल्याने त्यांचा पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यास उशीर झाला. आज त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का या […]
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती
मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना मंजुरी दिली आहे. शनिवारी रात्री अखिल भारतीय कमिटीनं हे जाहीर केलं. गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमधील गटबाजी हा पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरत होता. याआधी लोकसभा निवडणुकींच्या […]
कायदेशीर त्रासापासून कोरोना लस निर्मात्यांना संरक्षण मिळायला हवं, आदर पुनावाला यांची सरकारकडे विनंती
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी सरकारकडे एक विनंती केली आहे. कोरोना महामारीच्या काळात लस निर्मात्यांना कायदेशीर त्रासापासून संरक्षण मिळायला हवं, असं पूनावाला यांनी म्हटलं. ‘कार्नेगी इंडिया’च्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेत बोलताना पुनावाला यांनी ही मागणी केली. लस निर्माते भारत सरकारसमोर ही गोष्ट लवकरच मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. कोव्हिड १९ व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी लस बनवताना […]
लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस
चारा घोटाळ्यात दोषी ठरलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर डॉ. उमेश प्रसाद यांना माध्यमांमधील अनधिकृत वक्तव्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की लालू यादव यांची तब्येत ठीक नाही आणि त्यांची किडनी फक्त 25 टक्के कार्यरत आहे. या प्रकरणात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राजेंद्र इंस्टीट्यूट […]
IND vs AUS : भारतीय संघाला धक्का, मोहम्मद शमीच्या हाताला फ्रॅक्चर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. आता भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने त्याला उर्वरित तीन कसोटी सामन्यांतून वगळण्यात आलं आहे. अॅडलेड येथे शनिवारी झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजीदरम्यान पॅट कमिन्सचा उसळता चेंडू शमीच्या उजव्या हातावर जोरात आदळला होता. त्याला […]
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यावर कारवाई
श्रीनगर : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांची सुमारे १२ कोटींची संपत्ती संलग्न केली आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) मधील आर्थिक गडबडीच्या प्रकरणात फारूक अब्दुल्ला यांच्याविरूद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. संलग्न मालमत्तांमध्ये फारूक अब्दुल्लाच्या तीन घरांचा समावेश आहे. ईडीनुसार २००५ ते २०११ दरम्यान जेकेसीएला बीसीसीआयकडून एकूण १०. ७८ कोटी रुपये […]










