Devendra Fadnavis gave an answer to Chief Minister Uddhav Thackeray

मनात शंका असेल तर.. कांजूर कारशेडबाबतच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर

महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी कांजूर कारशेडबाबतच्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे. याला ट्विटच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील सर्व महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं कि, मनात शंका असेल तर आज आरे कारशेडला जी जागा दिली, त्यापेक्षा एक इंच जास्त जागा भविष्यात दिली जाणार नाही, असा निर्णय करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आमची एकच विनंती आहे की,आता दुराग्रह सोडून द्यावा आणि मुंबईकरांच्या हितासाठी आरेच्या जागेवर कारशेडचा मार्ग तत्काळ प्रशस्त करावा. आरेच्या जागेला मा. सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. आरेची जागा अंतिम झाल्यानंतर काम सुद्धा बरेच पुढे गेले आणि 100 कोटी रुपयांचा खर्चही झाला. लोकशाहीत चर्चेला आमची कायमच तयारी असते आणि चर्चेतून मार्गही निघतो.

मेट्रो प्रकल्पात राज्य सरकारइतकाच निधी केंद्र सरकारचा सुद्धा आहे.केंद्राच्या मदतीने JICAने या प्रकल्पाला वित्तपुरवठा केला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी केंद्र सरकारने यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राला सहकार्य करण्याची भूमिका घेतली; यापुढेसुद्धा सहकार्याचीच भूमिका केंद्र सरकारची असेल!

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत